शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रामवाडीत  पूर्ववैमनस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:51 IST

रामवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ किशोर रमेश नागरे (२६, रामनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून फरार झाले़ नागरेच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असले तरी पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़

पंचवटी: रामवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ किशोर रमेश नागरे (२६, रामनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून फरार झाले़ नागरेच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असले तरी पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ महिनाभरात खुनाची ही दुसरी घटना असून, या घटनांमुळे पंचवटीत पुन्हा गँगवार सुरू झाल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  मयत नागरेचा भाऊ सचिन नागरे याने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास किशोर हा घरासमोरील मैदानात उभा होता.यावेळी सचिन... सचिन असा जोरजोराने आवाज दिल्याने ते घराबाहेर गेले असता त्यांना घरासमोरील मोकळ्या मैदानावर तोंडाला रुमाल बांधलेले संशयित लहान भाऊ किशोरच्या मानेवर, पाठीवर व पायावर धारदार शस्त्राने वार करीत होते़ सचिन नागरे यांनी मैदानाकडे धाव घेतली असता संशयित दुचाकीवरून फरार झाले़ सचिन नागरे यांनी गंभीर जखमी झालेला लहान भाऊ किशोर यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़  या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, शांताराम पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, निरीक्षक दिनेश बर्डेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते़ नागरे याचा खून कोणी व का केला याबाबतची माहिती समोर आली नसून पंचवटी पोलीस व गुन्हे शाखेने संशयितांच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.नागरे हा जाधव खून प्रकरणातील साक्षीदारसप्टेंबर २०१५ मध्ये ठक्कर बझार बसस्थानकाजवळील हॉटेल तुळजासमोर आर्थिक वादातून टोळक्याने रामवाडीतील गुणाजी जाधव याचा खून केल्याची घटना घडली होती़ टोळक्याच्या या मारहाणीत किशोर नागरे हादेखील गंभीर जखमी झाला तसेच या घटनेचा प्रमुख साक्षीदारही होता़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित व्यंकटेश मोरे व परेश मोरे यांच्यासह नऊ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे़ जाधव खून खटल्यात प्रमुख साक्षीदार असल्याने किशोर नागरेचा खून केला का? याचा पोलीस तपास करीत आहेत़पोलिसांपुढे आव्हान?गत महिन्यात पेठरोडवर अनिल गुंजाळ या युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेस महिना होत नाही तोच मंगळवारी (दि.१०) रात्री किशोर नागरे या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली़ पंचवटी परिसरात गत काही दिवसांपासून खुनी हल्ले, मारहाण, वाहनांच्या काचा फोडणे, दहशत माजविणे असे प्रकार घडले असल्याने गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे वा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़टोळीयुद्धाची चिन्हेगंगापूररोड परिसरातील एका हॉटेलमध्ये मोहन चांगले व त्याचा साथीदार दीपक सोनवणे यांच्या खुनाची घटना घडली़ यानंतर शहरात चांगले व पगारे या दोन टोळ्यांमध्ये संघर्ष होऊन शहरातील शांततेला धोका निर्माण झाला होता. यानंतर वर्षभरातच भीम पगारे याच्या खुनाची घटना घडली होती. चांगले खुनातील संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली़ यानंतर बदल्याच्या भावनेतून या टोळ्या सक्रिय असल्याच्या काही घटना घडल्या होत्या. गुणाजी जाधव खुनातील साक्षीदार असल्यानेच नागरेचा खून केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, पोलिसांनी या घटनांची वेळीच दखल न घेतल्यास टोळीयुद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून