शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जानोरी येथील युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:26 IST

दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. १५) रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल विष्णू सरनाईक असे मृत युवकाचे नाव आहे.

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. १५) रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल विष्णू सरनाईक असे मृत युवकाचे नाव आहे.मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता सदर युवक जानोरी येथील असल्याचे समजले. मयत युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर युवक जानोरी ग्रामपंचायतच्या सदस्य संगीता सरनाईक यांचा मुलगा आहे. अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे करीत आहेत.शनिवारी सायंकाळीदोन ओळखीतील युवक कुणालच्या घरी आले. त्यांनी ओझर येथील यात्रेस जायचे आहे असे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सांगून कुणालला सोबत घेऊन गेले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता शिवनई-म्हसरूळ रोडवर आंबेहिल डिफेन्स गेटच्या जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती शिवनईचे पोलीसपाटील पांडुरग गडकरी यांनी दिंडोरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :NashikनाशिकMurderखून