शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

डाव्या कालव्यात  बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:58 IST

मखमलाबाद-चांदशी डाव्या कालव्यालगतच्या रस्त्यावरून जात असताना अचानकपणे दुचाकीसह कालव्यात कोसळून युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : मखमलाबाद-चांदशी डाव्या कालव्यालगतच्या रस्त्यावरून जात असताना अचानकपणे दुचाकीसह कालव्यात कोसळून युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चांदवड तालुक्यातील धोडंबे गावातील रहिवासी असलेला कृष्णा संजय तांदळे (२४) या युवकाचा मृतदेह पाण्यात आढळून आला. कृष्णा हा त्याच्याजवळीलदुचाकीवरून (एमएच १५ डीएफ ५८२३) कालव्याच्या रस्त्याने जात असताना अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडला असावा, असा कयास पोलिसांनी बांधला आहे. त्याच्याजवळील आधारकार्डवरून युवकाची ओळख पोलिसांनी पटविली. दुचाकी पाण्यात तरंगत असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. तत्काळ मखमलाबाद गावातील पोलीस चौकीवरील कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला माहिती कळविली. पंचवटी उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला व जवानांनी कालव्यात उतरून पाण्यामध्ये शोध घेत युवकाचा मृतदेह रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बाहेर काढला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू