शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

हिसवळ बुद्रुक वळणावर अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:14 IST

लग्नाला अवघा एक महिना शिल्लक असतानाच, अपघातात नवरा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देनागरिकांत चिंता : अपघातांचे वाढते प्रमाण

नांदगाव : लग्नाला अवघा एक महिना शिल्लक असतानाच, अपघातात नवरा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नांदगांव मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक वळणावर टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक गंभीर जखमी झाला. याच रस्त्यावर टँकरच्या धडकेत १७ दिवसांत दोघांना जीव गमवावा लागला असून, तीन जणांना अपंगत्व आले आहे. अनियंत्रित वेगात धावणाऱ्या इंधन टँकरमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, त्यावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दुचाकी क्र. १५/एफ के ६०६१ हिस टँकरने धडक मारली. त्यात दुचाकीवरील जनार्दन सावळीराम वाघीरे (२२, रा.डाॅक्टरवाडी, ता नांदगांव) हा जागीच ठार झाला, तर अंकुश भागीनाथ डोळे (२५, जतपुरा ता.नांदगाव) गंभीर जखमी झाला. ठार झालेल्या जनार्दनचे फेब्रुवारी महिन्यात लग्न ठरले होते. तो सर्पदंशाने मयत झालेल्या काकांच्या दशक्रियेला डाॅक्टरवाडी येथे आला होता. तो व त्याचा मावसभाऊ अंकुश हे दोघे निफाड साखर कारखान्यावर कामाला चालले होते. दोघे ऊसतोड कामगार होते. रात्री उशिरा त्याच्यावर डाॅक्टरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू