शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पेट्रोल डिझेल दर वाढीविरोधात "युथ वॉक"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:31 IST

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याच्या आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने मागील चार वर्षांत साततत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचा अरोप करीत नाशिक शहरातील तरुणांनी शनिवारी (दि. ७) ‘युथ वॉक’ करीत सरकारविरोधात निषेध नोंदवला. यावेळी तरुणांनी ‘शेतीमालाचे भाव वाढवा, पेट्रोल डिझेलचे नाही’, सरकार तेरा अनोखा खेल, ‘डेटा सस्ता महेंगा तेल’ आदी घोषणांचे फलक हातात घेऊन सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देइंधन दरवाढीविरोधान नाशिकमध्ये आंदोलन तरुणांचा एकत्र येत 'यूथ वॉक'च्या माध्यमातून निषेध सराकरविरोधात फलक उंचावून व्यक्त केला रोष

नाशिक : पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याच्या आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने मागील चार वर्षांत साततत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचा अरोप करीत नाशिक शहरातील तरुणांनी शनिवारी (दि. ७) ‘युथ वॉक’ करीत सरकारविरोधात निषेध नोंदवला. यावेळी तरुणांनी ‘शेतीमालाचे भाव वाढवा, पेट्रोल डिझेलचे नाही’, सरकार तेरा अनोखा खेल, ‘डेटा सस्ता महेंगा तेल’ आदी घोषणांचे फलक हातात घेऊन सरकारविरोधात रोष व्यक्त केला. पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने होणाºया वाढीचा नाशिकच्या तरुणांनी कॅनडा कॉर्नरपासून ते भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रवेशद्वारापर्यंत पायी फेरी काढून विरोध केला. फेरीत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी व शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील तरुणांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेत इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले. आधीच बेरोजगारीच्या संकटाचा सामना करणाºया देशातील तरुणांना शिक्षण आणि नोकरीच्या शोधात बाहेर पडावे लागते. त्यात केंद्रातील भाजपाचे सरकार सातत्याने इंधनाची दरवाढ करून तरुणांच्या अडचणीत वाढ करीत आहे. इंधन दरवाढीमुळे अन्य जीवनावश्यक वस्तुंच्याही किमती वाढत असून, या महागाईचा विरोध करण्यासाठी शहरातील तरुणांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला. यावेळी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या तरुणांनी पक्षीय ओळख बाजूला ठेवून युथ वॉकमध्ये सहभाग घेतला. यात भूषण काळे, समाधान भारतीय, सुरेश नखाते, विश्वास वाघ, प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, योगेश कापसे, स्वप्नील घिया, अमोल गोरडे, यश बच्छाव, यश बच्छाव सुनित शर्मा, अक्षय ठोके, आकाश कोकाटे, राकेश जाधव, सागर निकम, तल्हा शेख, सिद्धांत बर्वे, प्रशांत खैरे आदींचा समावेश होता. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकPetrolपेट्रोल