शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महानगरपालिकेला युवा धोरण मसुदा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:53 IST

शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नाशकातील काही तरुणांनी युवा समन्वय समितीच्या माध्यमातून तरुणांच्या विकासात्मक दृष्टीने युवा धोरण अहवालाचा मसुदा तयार करून शनिवारी (दि.१९) महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे.

नाशिक : शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नाशकातील काही तरुणांनी युवा समन्वय समितीच्या माध्यमातून तरुणांच्या विकासात्मक दृष्टीने युवा धोरण अहवालाचा मसुदा तयार करून शनिवारी (दि.१९) महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे.युवक ही देशाची खरी शक्ती असल्याने त्यांच्यात राष्ट्रीयत्व, सामाजिक सहिष्णुता निर्माण होण्यासाठी तसेच त्यांना नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी तत्पर बनविण्याच्या उद्देशाने विभागसभेत २२ आॅगस्ट २०१४ लाच युवा धोरण सादर करण्यात आले होते. युवकांसमोरील वाढत्या बेकारीच्या समस्येसोबत गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता अशा समस्या उभ्या राहत आहेत. या समस्यांवर मात करून युवकांना नवी दिशा देण्याच्या उद्देशाने युवकांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवर तरुणांच्या विकासासंदर्भात विचार करीत युवा समन्वयक समितीतर्फे नाशिक महानगरपालिकेला हा अहवाल सादर करण्यात आला आहे.युवा धोरणाविषयी विविध उपाययोजना असलेला मसुदा अहवाल स्वरूपात युवा समन्वय समितीचे भूषण काळे, देवांश जोशी, प्रशांत खैरे, रवि जन्नवार, प्रफुल्ल वाघ, सिद्धांत बर्वे, युगंधर दोंदे, प्रशांत मदाणे, कमलेश काळे आदींनी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे.या अहवालाच्या मसुद्यात महानगरपालिका सभागृह युवा मंडळांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे, अभ्यासिकांच्या संख्येत वाढ करणे, युवा पुरस्कार, मनपा समुपदेशन केंद्र, कुस्ती पोर्च, मैदानांची उपलब्धता, मुलींसाठी वसतिगृहांची निर्मिती, रोजगार मेळावा आणि अन्य मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक