शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल उशिरा आणल्याच्या किरकोळ कारणावरून सातपूरला युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:41 IST

नाशिक : दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून युवकावर  वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़ अमोल अशोक बागले (२३, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़

ठळक मुद्दे सिएट कंपनीजवळील घटना : तिघा संशयितांना अटक : सातपूर पोलिसांत गुन्हा

नाशिक : दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून युवकावर  वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़ अमोल अशोक बागले (२३, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयितांना अटक केली आहे़ दरम्यान सातूपर परिसरात आठवडाभरात दोन तरुणांच्या खूनाच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे़

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या वाहनावर अमोल बागले हा चालक म्हणून कामास होता. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत असताना सीएट कंपनीजवळ त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्याने मित्र संशयित सुनील पंडीत खरात (२१), लोकेश अशोक थोरात (१८), किरण मधुकर बिन्नर (१९, तिघेही रा़ साईबाबानगर चौक, शिवाजीनगर, सातपूर) यांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले़ त्यानुसार तिघेही पेट्रोल घेऊन गेले मात्र त्यांना येण्यास उशिर का झाला या कारणावरून अमोल बागले याने शिवीगाळ केली व एकाच्या कानशिलातही लगावली़

या प्रकारामुळे संतापलेल्या तिघाही संशयित मित्रांनी अमोल बागले यास जबर मारहाण केली. तर एकाने त्याच्याकडील धारदार हत्यार काढून पोटात भोसकले. यानंतर बागलेच्या पोटातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने या तिघा मित्रांनी त्यास दुचाकीवर बसवून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात प्रथम जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास अमोल बागले याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस व राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती़ तसेच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, शांताराम पाटील, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक अशोक भगत, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली़

टॅग्स :MurderखूनNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी