शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावरील कंटेनरला दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्याचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:12 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रात्रीच्या सुमारास घडली़ भूषण सुरेश सोनवणे (रा. मीरानगर, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रात्रीच्या सुमारास घडली़ भूषण सुरेश सोनवणे (रा. मीरानगर, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़  अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर कंटेनर (एमएच ०४, एफक्यू ७७५६) उभा होता़ या कंटेनरचालकाने पार्किंग लाईट वा रस्त्यावर उभा असल्याची ओळख पटेल अशी कोणतीही खबरदारी घेतलेली नव्हती़ यावेळी पाथर्डी बाजूकडील उड्डाणपुलावरून दुचाकीवर (एमएच १५, एव्ही ५१३८) भूषण सुरेश सोनवणे (२४) व त्याचा सहकारी ललित दोधा सोनवणे (२२, दोघेही रा़ मीरानगर, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक) हे दोघे येत होते़  भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभा असलेला कंटेनर लक्षात न आल्याने सोनवणे याची दुचाकी पाठीमागून या कंटेनरला जाऊन धडकली़ यामध्ये दुचाकीचालक भूषण सोनवणे हा जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेला ललित सोनवणे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला आहे़ या प्रकरणी गंभीर जखमी ललित सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालकाविरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़उड्डाणपुलावर दुचाकी, तीनचाकी वाहनांना बंदीनाशिक शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकी व तीनचाकी वाहनांना बंदी असून, या नियमाचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते़ मात्र, या कारवाईत सातत्य नसल्याने सर्रास उड्डाणपुलावरून दुचाकी ये-जा करतात़ उड्डाणपुलावर आतापर्यंत अनेक दुचाकींचे अपघात झाले असून, यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे़ उड्डाणपुलावर या छोट्या वाहनांना बंदी असताना अशी वाहने चालविणाºयांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे़

टॅग्स :Accidentअपघात