चवटी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीनंतर डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून युवकाची हत्त्या केल्याची घटना मालेगाव स्टॅन्ड येथे घडली. भरदुपारी गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काहीकाळ धावपळ झाली. घटनेनंतर पलायन करणाऱ्या फुलेनगर येथील संशयितास पोलिसांनी रामकुंड परिसरातून ताब्यात घेतले आहे. या घटनेत कामटवाडा येथे राहणारा सुनील प्रकाश बैरागी (३२) याचा मृत्यू झाला. मयत बैरागी याचा मित्र मिलिंद मधुकर पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गणेश वायकंडे याला गजाआड केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामटवाडे येथे राहणारा बैरागी व फुलेनगरचा वायकंडे असे दोघे जण सोमवारी मालेगाव स्टॅन्ड येथील एका देशी दारू दुकानात दारू पिण्यासाठी बसले होते. त्यांच्यात दारू पिण्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन वादाचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. दोघांनीही मद्यप्राशन केले असल्याने दोघेही दुकानाबाहेर आल्यानंतर संशयित वायकंडे याने बैरागी याच्या डोके व कपाळावर दांड्याने प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेला बैरागी रक्तबंबाळ होऊन कोसळला. त्यानंतर संशयित वायकंडे याने तेथून पलायन केले. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी बैरागी यास रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
किरकोळ कारणावरून युवकाची हत्त्याां
By admin | Updated: February 9, 2016 00:01 IST