याबाबत माहिती मिळताच कळवण येथील स्थानिक डॉक्टर व पोलीस यंत्रणा घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. यावेळी मदतीसाठी स्थानिक नागरिक उपस्थित होते. नगरसूल येथील काही युवक मार्कंडेय ऋषी डोंगरावर दर्शनासाठी जात होते.अचानक मधमाशांनी या युवकांनी हल्ला चढविला. त्यात अविनाश पैठणकर, अरु ण धनवटे, शरद अभंग, योगेश घाडगे, सचिन जाधव, नितीन भगत, किशोर जाधव, नंदू रावते, गणेश बोराडे, गुलाब जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावर कळवण येथील रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.
मार्कंडेय ऋषी डोंगरावर मधमाशांकडून युवकांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:02 IST