नाशिक : वडाळागावात लहान बहिणीला शाळेत सोडून घरी जाणाऱ्या युवतीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला असून, परिसरातील नागरिकांनी हा संशयिताला बेदम चोप दिला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.११) रोजी दुपारी १२ बाराच्या सुमारास पीडित युवती तिच्या बहिणीला शाळेत सोडून घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या इसमाने तिच्याजवळ दुचाकी थांबवत युवतीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत पीडित युवतीला दुचाकीवर बसण्यासाठी सांगितले. यावेळी युवतींने प्रतीकार करीत घाबरून आरडाओरडा सुरू केल्याने संशयिताने वडाळागाव चौफुलीकडे पळ काढला. मात्र युवतीचा आरडाओरडा ऐकून जमलेल्या नागरिकांनी युवतीची छेड काढणा ऱ्याच्या पाठलाग करून त्यावा पकडले व चांगलाच चोप दिला. त्यानंतर नागरिकांनी आणि पोलिसांचा स्वाधीन केला संशयित आरोपी अक्षय देसले (३१) विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत संशयिताला ताब्यात घेतले आहे.
नाशकात भरदिवसा रस्त्यावर युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:11 IST
नाशिक शहरातील वडाळागावात लहान बहिणीला शाळेत सोडून घरी जाणाऱ्या युवतीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला असून, परिसरातील नागरिकांनी हा संशयिताला बेदम चोप दिला आहे. मात्र शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या टवाळखोरांवरील पोलिसांचा वचक मात्र कमी होत आहे. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून पोलिसांमसोर महिलांवरील वाढत्या अत्याचारांचे गुन्हे नियंत्रित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
नाशकात भरदिवसा रस्त्यावर युवतीचा विनयभंग
ठळक मुद्देवडाळा रस्त्यावर युवतीचा विनयभंगविनयभंग करणाऱ्यास नागरिकांचा चोप