शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महापुरु षांच्या विचारांचा वारसा तरु णांनी चालवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 18:36 IST

महापुरु षांना विशिष्ट धर्मात, जातीत, पंथात न बांधता त्यांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्र मण करणे त्यांच्या विचारांशी बांधीलकी असणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रा. जावेद शेख म्हणाले.

ठळक मुद्देजावेद शेख : पिंपळगावी व्याख्यानमालेचा समारोप

पिंपळगाव बसवंत : महापुरु षांना विशिष्ट धर्मात, जातीत, पंथात न बांधता त्यांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्र मण करणे त्यांच्या विचारांशी बांधीलकी असणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रा. जावेद शेख म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ विभाग व कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव ब. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी प्रा. शेख बोलत होते. व्यासपीठावर डॉ. योगेश बस्ते, डॉ. शरद बिन्नोर, डॉ. जितेंद्र साळी, प्रा. चित्ररेखा जोंधळे, केंद्र कार्यवाह प्रा. नारायण शिंदे उपस्थित होते.महात्मा फुले समग्र खंड य. दि. फडके लिखित ग्रंथाचे ग्रंथ अन्वेषण करताना ते म्हणाले की, महात्मा फुले यांचे साहित्य सर्वांनी वाचून, समजून घेतले तर आजच्या काळातील अनेक समस्या सुटतील. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ शेतकºयांनी समजून घेतला तर शेतकरी आत्महत्या होणार नाही कारण फुलेंनी मांजरीजवळ २०० एकर जमीन विकत घेऊन शेती केली व शेतमाल निर्यात केला. त्यानंतर त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महात्मा फुले यांनी एक हजार ओळींचा आधुनिक पोवाडा शिवाजी महाराजांवर लिहिला. त्यांची समाधी शोधून काढली. पहिली शिवजयंती साजरी केली.शिवाजी महाराज हे कुळवाडीभूषण होते ते कुणब्यांचे, सर्वसामान्य रयतेचे राजे होते. असे फुलेंनी आपल्या ग्रंथातून सांगितले. सत्यशोधक समाजाच्या विचारांचा अंगीकार करून फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्री प्रसूती केंद्र आपल्या घरात स्थापन केले. सावित्रीबाई फुले यांनी ३४ बाळंतपणे केली. त्यामुळे महापुरु षांना समजून घ्यायचे असेल तर त्यांचे स्रीविषयक विचार समजून घेतले पाहिजे.व्याख्यानमालेचे संयोजन व प्रास्ताविक केंद्र कार्यवाह प्रा. नारायण शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेची गरज व उद्देश स्पष्ट केले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या डॉ. एस.एस. घुमरे यांचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रदर्शन प्रा. सीताराम निकम यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक