शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 22:46 IST

सिन्नर: तालुक्यातील आटकवडे शिवारात रोहित्रावर विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी सिन्नरच्या आडवा फाटा येथील वितरण कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला. यावेळी शेतकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह वीज वितरण कार्यालयावर नेण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

ठळक मुद्देआटकवडे : संतप्त नागरिकांचा वीज वितरण विरोधात मोर्चा

सिन्नर: तालुक्यातील आटकवडे शिवारात रोहित्रावर विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी सिन्नरच्या आडवा फाटा येथील वितरण कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला. यावेळी शेतकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह वीज वितरण कार्यालयावर नेण्याचा प्रयत्नही करण्यात आला.शेतीच्या थकीत वीजबिलामुळे वीज वितरणकडून आटकवडे शिवारात आज रोहित्राचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू होती. वीज वितरणच्या कारवाईची कुठलीही कल्पना नसल्याने सुनील दत्तू वाघ (२२) काम करीत होता. त्यावेळी विजेचा धक्का लागून सुनील जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वाहने भरून येत आडव्या फाट्यावरील वीज वितरणच्या कार्यालयावर आपला मोर्चा नेला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे स्वत: कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन कार्यालयावर पोहचले. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर संतप्त शेतकरी शांत झाले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सुनीलच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. 

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू