लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : गॅलरीत उभा असलेल्या युवकाचा तोल जाऊन जमिनीवर पडल्याने मृत्यू झाला. विशाल शिवाजी कोरडे असे या युवकाचे नाव आहे.नाभिक समाजाचे युवा कार्यकर्ता विशाल सकाळी नळाला पाणी आल्यानंतर रो हाऊसच्यावर असलेल्या टाकीतील पाणी पहायला गेला होता. टाकी भरल्याचे लक्षात आल्यावर त्याने घरात असलेल्या आईला आवाज दिला. यावेळी गॅलरीतून तोल गेल्याने तो खाली कोसळला. काहीतरी आवाज झाल्याचे कुटुंबीय बाहेर आले. त्यावेळी विशाल खाली पडलेला दिसून आला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यास दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नाभिक समाजाचे ज्येष्ठ शिवाजी कोरडे यांचा तो मुलगा होत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गॅलरीतून पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:26 IST
दिंडोरी : गॅलरीत उभा असलेल्या युवकाचा तोल जाऊन जमिनीवर पडल्याने मृत्यू झाला. विशाल शिवाजी कोरडे असे या युवकाचे नाव आहे.
गॅलरीतून पडून युवकाचा मृत्यू
ठळक मुद्देसकाळी नळाला पाणी आल्यानंतर रो हाऊसच्यावर असलेल्या टाकीतील पाणी पहायला गेला होता.