मालेगाव : शहरातील नागाई कॉलनीत साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या योगेश चिंतामण साबळे ( ३३) या तरुणाने आपल्या राहत्या घरी छताच्या लाकडी सरईला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. त्याच साडू विनोद मनोहर साबळे यांनी त्यास उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. कॅम्प पोलिसात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.
तरुणाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 01:53 IST