येवला : तालुक्यातील भिंगारे येथे विजेच्या धक्क्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.शनिवारी (दि.२४) दुपारी चार वाजेच्या सुमारास भिंगारे येथे बाबासाहेब सर्जेराव गाडे (३५) हे आपल्या शेतातून लोखंडी दांडा असलेला वखर घेऊन जात होते. यावेळी शेतातील लोंबकळलेल्या वीज तारांचा वखराच्या लोखंडी दांड्याला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने बाबासाहेब गाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.गाडे हे महावितरणच्या येवला कार्यालयात सुरक्षा रक्षक होते. विशेष म्हणजे शुक्रवारी रात्री रात्रपाळी करून शनिवारी शेतात काम करण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडल्याने भिंगारे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, महावितरणच्या दुर्लक्षामुळे सदर घटना घडल्याचा आरोप गाडे यांच्या नातेवाईकांनी केला असून, मृत गाडे यांच्या कुटुंबास नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
भिंगारे येथे विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 00:39 IST
येवला : तालुक्यातील भिंगारे येथे विजेच्या धक्क्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
भिंगारे येथे विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
ठळक मुद्देवखराच्या लोखंडी दांड्याला स्पर्श