शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत युवाशक्तीचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:54 IST

इगतपुरी तालुका : १५ ग्रामपंचायतीचे निकाल घोषित; नांदगाव सदोमध्ये २५ वर्षांनंतर निवडणूक

ठळक मुद्देटाकेघोटी येथे एकही अर्ज न आल्याने सरपंचाची जागा रिक्त राहिली.

इगतपुरी : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा निकाल गुरुवारी (दि.२७) घोषित करण्यात आला. संपूर्ण निकाल पाहता ह्या निवडणुकीत युवकांचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले. २५ वर्षांपासून एकदाही निवडणूक न झालेल्या नांदगाव सदो ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याठिकाणी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या उमेदवारांना यश संपादित करता आले. कृष्णनगर ग्रामपंचायतीत माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी २५ वर्षाची सत्ता अबाधित ठेवली. ग्रामपंचायतीत वार्ड क्र मांक २ मधील तीनही उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने दोन उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे यामधील एक उमेदवार गेल्यावेळी चिठ्ठी पद्धतीने पराभूत झाला होता. तो यावेळी चिठ्ठीने तारला. विजयी उमेदवार आण त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.इगतपुरी तालुक्यातील धारगाव, शिरसाठे, नागोसली, ओंडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दौंडत, उंबरकोन, सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे आणि नांदगावसदो ह्या १५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. नांदगाव सदो येथे चुकीचे आरक्षण असल्याच्या मुद्यांवरून गेल्या २५ वर्षांपासून निवडणूक झालेली नव्हती. यावेळी झालेल्या निवडणुकीत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे उमेदवार विजयी झाले. टाकेघोटी येथे एकही अर्ज न आल्याने सरपंचाची जागा रिक्त राहिली.तिनही उमेदवारांना समान मतेइगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर ग्रामपंचायतीत वार्ड क्र मांक २ मध्ये निकाल लागताना वेगळाच चमत्कार घडला. या वार्डातील तिन्ही उमेदवारांना समसमान ९५ मते मिळाली. या उमेदवारांतुन २ उमेदवार निवडून द्यायचे असल्याने तहसीलदार वंदना खरमाळे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदारांच्या दालनात चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यामध्ये सुरेखा धोंगडे, सोनाली धोंगडे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक