शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

जलतरण तलावात गिरविले योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 5:19 PM

ेनाशिक : दि. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरसीइ एज्युकेशन, इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॅडिशनल गेम्स अ‍ॅण्ड सायन्स, तसेच केटीएचएम कॉलेज बोट क्लब नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाण्यातील योगाभ्यासाचे धडे जलतरणपटूंनी गिरविले.

ठळक मुद्दे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यातील योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक शिरीष प्रभाकर चव्हाण यांनी केले होते.

ेनाशिक : दि. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरसीइ एज्युकेशन, इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॅडिशनल गेम्स अ‍ॅण्ड सायन्स, तसेच केटीएचएम कॉलेज बोट क्लब नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाण्यातील योगाभ्यासाचे धडे जलतरणपटूंनी गिरविले. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यातील योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक शिरीष प्रभाकर चव्हाण यांनी केले होते. यामध्ये ४१ मुला-मुलींनी सहभाग नोंदवून १५ योगासनांचे अप्रतिम सादरीकरण केले. पाण्यात वृक्षासन, ताडासन, गरु डासन, उत्कटासन, संतुलनासन, नटराजासन, अर्धचंद्रासन अशा विविध प्रकारच्या आसनांचा सराव करण्यात आला.जलतरण प्रशिक्षक व योग अभ्यासक शिरीष चव्हाण यांनी पाण्यात जाऊन भुजंगासन, सेतुबंधासन, कोनासन, सर्वांगासन, वज्रासन यांसारख्या विविध आसनांचे सादरीकरण केले. या कार्यक्र माच्या आयोजनाकरिता निशा चव्हाण, प्रा. योगेश गांगुर्डे, राष्ट्रीय नौकानयन प्रशिक्षक समाधान गवळी, भूषण काकड यांचे सहकार्य लाभले.भारतातील पारंपरिक ठेव्यांमध्ये योग ही सर्वोत्कृष्ट कला जोपासली गेली आहे. जीवनात उपयुक्त असा मोलाचा ठेवा आपल्या संस्कृतीत आहे. जसे आपले योग व पारंपरिक खेळ यांचे महत्त्व जगाला पटले आहेच. ते आपणही आत्मसात करणे आवश्यक आहे. पाण्यातील योगाभ्यासाचे खूप महत्त्वपूर्ण पाऊल आम्ही उचलले आहे.- शिरीष प्रभाकर चव्हाण, योग अभ्यासक, जलतरण प्रशिक्षक.नाशिकचे नाव जलतरण क्षेत्रात आंतररराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. पाण्यातील योगासने या प्रकारच्या प्रयोगांचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. एक्वा एरोबिक या आंतरराष्ट्रीय व्यायाम प्रकारा प्रमाणेच पाण्यातील योगासनांची उपयुक्तता खूप मोठी आहे, म्हणूनच याचा प्रचार-प्रसार होणे आवश्यक आहे.- हरी सोनकांबळे, मुख्य व्यवस्थापक, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव.