शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

येवलेकरांनी कोरोनामुक्तीवर केले शिक्कामोर्तब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:33 IST

नाशिक : रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडूनच कोरोनाच्या संसर्गाचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णाला झालेल्या लागणनंतर संपूर्ण येवला शहर व तालुक्यातील गावागावात कोरोनाचा प्रसार वाढीस लागून बाधित रुग्णांची संख्या ३३ पर्यंत पोहोचली. जागतिक पातळीवर प्रगत देशांना भयभीत करणाऱ्या कोरोनावर अखेर आरोग्य विभागाने महिनाभर सातत्याने स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून येवला तालुक्याने कोरोनामुक्तीवर शिक्कामोर्तब केले.

नाशिक : रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडूनच कोरोनाच्या संसर्गाचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णाला झालेल्या लागणनंतर संपूर्ण येवला शहर व तालुक्यातील गावागावात कोरोनाचा प्रसार वाढीस लागून बाधित रुग्णांची संख्या ३३ पर्यंत पोहोचली. जागतिक पातळीवर प्रगत देशांना भयभीत करणाऱ्या कोरोनावर अखेर आरोग्य विभागाने महिनाभर सातत्याने स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवूनयेवला तालुक्याने कोरोनामुक्तीवर शिक्कामोर्तब केले. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यापाठोपाठ येवला येथे कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत कोरोनाची पाळेमुळे रोवली गेल्याची भीती व्यक्त केली गेली. निव्वळ मालेगावी सुनेचे बाळंतपण करण्यासाठी गेलेल्या येवल्याच्या एकाच कुटुंबातील सात जणांमध्ये एका पाठोपाठ कोरोनाची लक्षणे आढळून आली. पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याला तत्काळ अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले व खबरदारी म्हणून कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही संशयित म्हणून दाखल केले असता, तेदेखील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. येवल्यात सापडलेल्या या रुग्णांचे मालेगाव कनेक्शन होते व सर्वच्या सर्व उपचारार्थ दाखल झाल्याने आरोग्य खात्याने काहीसा सुटकेचा श्वास घेतला असताना येवल्यातील ग्रामीण रुग्णालयातील एका महिला कर्मचाºयात कोरोनाची लक्षणे दिसून आली. ज्या महिलेचे मालेगावी बाळंतपण झाले ती नंतर वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आली होती. तिच्या संपर्कात महिला आरोग्य कर्मचारी आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला. संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरली. ग्रामीण रुग्णालयातील ४४ कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता, त्यातील बारा कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट झाले. त्यातून प्रचार व प्रसारामुळे कोरोनाने येवला शहरासह ग्रामीण भागातही हातपाय पसरविले. मात्र कोरोनावर मात करण्याचा विडा आरोग्य विभागानेच उचलला. येवल्यात कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर सुरू करून कोरोनाबाधितांना तेथे हलविले व जलदगतीने उपचार सुरू केले. जवळपास दोनशेहून अधिक संशयितांना केअर सेंटरमध्ये तर बाधितांवर हेल्थ सेंटरमध्ये आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब केला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने संपूर्ण गावात रुग्ण सर्वेक्षण मोहीम राबविली. कंटेनमेंट झोन जाहीर करून कोरोनाचा प्रचार, प्रसारावर नियंत्रण मिळविले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी सर्व विभागांशी समन्वय ठेवून कोरोना विरुद्धच्या लढाईत विजय मिळविला व तब्बल एका महिन्यानंतर येवल्याला कोरोनाच्या महामारीतून मुक्त केले.----------------------------कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करून तेथील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी २०० आरोग्य पथके कार्यरत होती. त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. याशिवाय रुग्णांवर स्थानिक ठिकाणीच उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केअर सेंटर, हेल्थ केअर सेंटर सुरू करून सर्व यंत्रणांशी समन्वयाची भूमिका बजावली. त्यामुळे कोरोनाचे नवीन रुग्ण सामोरे येऊ शकले नाहीत. सर्वांच्या प्रयत्नांनी येवला कोरोनामुक्त होऊ शकले.- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक