शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

येवला, सटाण्याला हगणदारीमुक्तीचा पुरस्कार

By admin | Updated: October 15, 2016 03:02 IST

येवला, सटाण्याला हगणदारीमुक्तीचा पुरस्कार

येवला : नगरपरिषदेस स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य शासनाचा हगणदारीमुक्त शहराचा पुरस्कार प्राप्त झाला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, उपनगराध्यक्ष पंकज पारख, मुख्याधिकारी राहुल वाघ, स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, अभियानप्रमुख श्रावण जावळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. येवले नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कमिटीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले़ यात वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयाची पाहणी करण्यात आली़ विविध भागातील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांना प्रतिसाद मिळाल्याने शहरास हगणदारीमुक्त शहर घोषित करण्यात आले.शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ज्या कुटुंबांना वैयिक्तक शौचालय नाही अशा कुटुबांना शौचालय उपलब्ध करून दिले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार येवला नगरपरिषदेस ९८१ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याचे निदर्शनास आले़ नगरपरिषदेने शहरात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. त्यानुसार १५०० कुटुंबांकडून शौचालयाचे विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार नगरपरिषदेने अर्जाची छाननी करून ८८५ लाभार्थींना १७ हजार अनुदान देण्यात आले. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सदर अभियान राबविण्यासाठी नगरपरिषदेचे स्वच्छता विभाग तसेच प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.सदर अभियानांतर्गत आलेल्या अर्जांची छाननी करणे व शौचालयाचे काम पूर्ण करणे तसेच माहिती संकलन करणे यासाठी पर्यवेक्षक सत्यवान गायकवाड, स्वच्छता निरीक्षक घनश्याम उंबरे, सुनील संसारे, लिपिक दीपक जावळे यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)या अभियानांतर्गत सर्व्हेक्षण टीम व गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आले. सदर पथकाव्दारे पहाटे 4 ते स. 7 दरम्यान उघडयावर शौचास बसणार्या नागरिकांना प्रतिबंध करु न त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे घरापर्यत सवादय नेऊन सोडण्यात येऊन त्याचे स्वच्छते विषयी प्रबोधन करण्यात आले. वैयिक्तक शौचालयाबददल माहीती देण्यात आली. गुड माँर्निग पथकामध्ये मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह स्वच्छता विभागाचे क. अभियंता सत्यवान गायकवाड, स्व निरीक्षक सुनिल संसारे, घनश्याम उंबरे व हेड मुकादम श्रावण जावळे, मुकादम प्रशांत पाटील, शशिकांत मोरे, राजेंद्र तायडे, कृष्णा हंडी, गोपी जावळे, नितिन लोणारी यांनी विशेष कार्य केले. तसेच स्वच्छता कामगांर कैलास बाकळे, दिपक उमरे दिपक घारु , दिपक बोडखे, दस्तगीर शेख, विजय झाल्टे, मनोज गुडेकर, एकनाथ कांबळे, आनंद गांगुर्डे, अनिल अिहरे, अिहल्याबाबा सातभाई, रवि बोडखे, शक्ती निंदाणे, कदीर शेख, अंबादास लहुंडे, सुभाष बोडखे, शाम लोंढे, अर्जुन माळी, धनराज ढिकले, किशोर शेलार, रु पेश तेजी, मोहमद शेख व महीला स्वच्छता कामगार कलावती चव्हाण, शाहिस्ता शेख, शकीला शेख, शारदा गडदे, तान्हाबाई बोडखे, हसिना युसुफ, गंगा घुसर यांनी गुड मॉर्निग पथकात मोलाचे कार्य केले.येवले नगरपरिषदेस मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील सप्तपदी मधील तिसरे पाऊल अंतर्गत हगदारीमुक्त शहराचे पारितोषिक मिळाले असुन या अभियानात शहरातील नागरिकांनीही मोठया उत्साहाने सहकार्य केल्यामुळे त्याबददल नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, उपनगराध्यक्ष पंकज पारख व पालिकेचे सर्व नगरसेवक / नगरसेविका तसेच मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी नागरिकांचे आभार मानले. (वार्ताहर)