येवला : येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांदा आवक टिकून बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र मागील आठवड्यात दिसले.सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर कांद्याची आवक टिकून होती व बाजारभाव स्थिर होते. कांद्यास देशांतर्गत व राज्यात तसेच परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक १८,८९९ क्विंटल झाली असून, गावराण कांद्याचे भाव किमान रु. ६०० ते कमाल २४८१ तर सरासरी रु. १८०० पर्यंत होते तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ८०४२ क्विंटल झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. २२७६ तर सरासरी रु. १८००पर्यंत होते. गहू गेल्या सप्ताहात एकूण आवक ३० क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १४०० ते कमाल रु. १७८२ तर सरासरी रु. १६६०पर्यंत होते. गेल्या सप्ताहात बाजरीची एकूण आवक १४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १२५० ते कमाल रु. १५४२ तर सरासरी १४४१पर्यंत होते. सप्ताहात हरभऱ्याची आवक २३ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. २१२२ ते कमाल रु. २६०० तर सरासरी २४५१ पर्यंत होते तसेच मक्याची एकूण आवक १५ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १२९९ ते कमाल रु. १४५२ तर सरसरी रु. १३५१ पर्यंत होते.
येवला, अंदरसूल येथे कांदा आवक टिकून
By admin | Updated: July 20, 2014 01:42 IST