येवला : येवला कांदा मार्केटला कांद्याची शुक्रवारी सहा हजार क्विंटलची आवक होऊन बाजारभाव २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य ३०० डॉलर प्रतिटन वाढविले असले तरी, अद्याप त्याचे दृश्य परिणाम आणखी १५ दिवसांनी दिसतील, असा अंदाज आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. महिनाभराने पाऊस लांबल्याने पोळ कांद्याची लागवड उशिरा होईल. तेव्हा बाजारात नवीन पोळ कांदा डिसेंबरमध्ये मार्केटला येऊ शकेल. पुढील चार महिने तरी साठवणीतील उन्हाळ कांद्यावरच अवलंबून रहावे लागेल. नेहमीप्रमाणे आॅक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान पोळ कांदा बाजारात येत असतो; पण पावसाने गणित चुकविली आहे. शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहे. बी-बियाणांसह खतांचीदेखील बाजारपेठ थंडावली आहे. पिण्याच्या पाण्याचीच चिंता सतावत असल्याने काटकसरीने पाणी वापराचे आवाहन अधिकारी करू लागले आहेत. १५ जुलैपर्यंत आहे. तो पाणीसाठा स्थानिक पातळीवर वापरावा लागेल. (वार्ताहर)