शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
2
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
3
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
4
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
5
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
6
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
7
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
8
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
9
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
10
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
11
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
12
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
13
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
14
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
15
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
16
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
17
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
18
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
19
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
20
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!

येवला : कोष्टी वधू-वर परिचय मेळावा

By admin | Updated: August 23, 2015 22:51 IST

देशभरातील समाजबांधवांची हजेरी

येवला : देवांग कोष्टी समाजाच्या वतीने अखिल भारतीय बहुभाषिक कोष्टी/कोष्टा वधू-वर परिचय मेळावा येथे झाला. या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगढ तसेच विविध १२ राज्यांतून सुमारे पाच हजार समाजबांधव उपस्थित होते. मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून छत्तीसगढचे आमदार मोतीलाल देवांगण हे होते. विविध राज्यांतील कोष्टी समाज असंघटित असल्याने प्रगतीपासून दूर राहिला आहे. प्रगतीसाठी समाज संघटित करण्याची आवश्यकता आहे. येवल्यातील वधू-वर संमेलन निश्चित आपल्या पाल्यांना मजबुती देऊन जाईल, अशी खात्री असल्याचे आमदार मोतीलाल देवांगण यांनी यावेळी दिली. दरम्यान, श्रीदेवांगण पुढे म्हणाले की, हे माझे भाग्यच आहे तसेच छत्तीसगढच्या वगळता इतर राज्यांतील समाजाच्या लोकांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. तसेच अनेक क्षेत्रांत समाज पुढे जात असल्याचे सांगून याबाबत समाधान व्यक्त केले. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय गुरू व भाजपा गुजरात राज्य मीडियाचे प्रभारी अंबालालजी कोष्टी यांनी मोदींसोबत केलेल्या कार्याच्या आठवणी सांगून मार्गदर्शन केले. यावेळी अ.भा कोष्टी समजाचे उपाध्यक्ष महेश देवांगण यांनी समाज्याच्या घटकांनी एकत्र येऊन प्रगतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. कर्नाटक येथून आलेले शंकर बुचडी यांनी कार्याचा लेखाजोखा मांडला. प्रास्ताविकात समाजाचे अध्यक्ष मनोज भागवत यांनी कार्यक्र माबाबत विविध मुद्दे आणि येवल्याच्या परंपरेचा आढावा घेतला. अ.भा.कोष्टी महिला परिषदेच्या मंजुषा लोळे यांनी महिलांच्या सबलीकरण व हातमाग, पैठणी क्षेत्रातील समाजाचे योगदान स्पष्ट केले. मेळाव्याचे उद्घाटन सेवकराम देवांगण, महेश देवांगण, कर्नाटक येथील शंकर बुचडी, गुजरातचे भाजपाचे नेते अंबालाल कोष्टी, आ.म.को.परिषद संस्थापक अध्यक्ष अरुण वरोडे, राजाध्यक्ष पंडित इदाते, अध्यक्ष मनोज भागवत आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे ७०० युवक, ४५० युवतींनी सहभाग नोंदविला. परिचय मेळावा यशस्वीतेसाठी महिला समिती अध्यक्ष हिरा वाघुंबरे, मनोज सगम, मनोज दिवटे, वाघुंबरे गुरुजी, कैलास घटे, संजय करंजकर, गणेश खळेकर, अतुल घटे, विलास कांबळे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)