शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात एक वस्त्र, एक करंजी मोलाची उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 00:04 IST

येवला : दिवाळी सणाच्या आनंदात समाजातील गरीब व दीनदुबळ्या वर्गातील बांधवांनाही सामावून घेण्याच्या उद्देशाने एक वस्त्र मोलाचे व एक ...

ठळक मुद्देआदिवासी, कष्टकरी कुटुंबाची दिवाळी केली खटपट युवा मंचने गोड

येवला : दिवाळी सणाच्या आनंदात समाजातील गरीब व दीनदुबळ्या वर्गातील बांधवांनाही सामावून घेण्याच्या उद्देशाने एक वस्त्र मोलाचे व एक करंजी मोलाची हे दोन उपक्रम खटपट युवा मंचतर्फे तालुक्यातील नागडे येथील आदिवासी वस्तीत राबविण्यात आले. यामुळे आदिवासी कष्टकरी कुटुंबांची दिवाळी गोड झाली आहे.नेहरू युवा केंद्र व खटपट युवा मंचच्या वतीने मुकेश लचके यांनी येवले शहरातील नागरिक, दुकानदार तसेच दानशूर व्यक्तींकडून तीन दिवस फिरून वस्त्र व फराळाचे संकलन केले. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारचे कपडे, महिलांसाठी साड्या, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे, भावाची भेट म्हणून वस्त्र तसेच फराळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळाले.सदर उपक्रमासाठी खटपट युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी संकलित केलेला फराळ व वस्त्रांची वर्गवारी करून तालुक्यातील नागडे परिसरातील प्राथमिक शाळेच्या समोरील आदिवासी वस्त्यांवरील बांधवांना व दीनदुबळ्यांना वाटप करण्यात आले. यामुळे आदिवासी कष्टकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी झाली.या उपक्रमात खटपट युवा मंचचे अध्यक्ष संयोजक मुकेश लचके, संत शिरोमणी नामदेव महाराज युवा सेवा समितीचे उपाध्यक्ष राम तुपसाखरे, चिटणीस पुरुषोत्तम रहाणे, संघटक अमोल लचके, श्री संत नामदेव शिंपी समाजाचे कार्यकारिणी सदस्य बळीराम शिंदे तसेच सेवा समितीचे कार्यकर्ते गोकुळ गांगुर्डे, वरद लचके, फेटा कलाकार श्रीकांत खंदारे आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Socialसामाजिक