कसबे सुकेणे :- संपूर्ण देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त मंदिरात दरवर्षी होणारा आषाढी एकादशी सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे , अशी माहिती दत्त मंदिर संस्थानने दिली.मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात दरवर्षी महानुभाव पंथीय भाविक आषाढी एकादशीला सामूहिक देवपूजा वंदन करतात. या सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो भाविक हजेरी लावत असतात. मौजे सुकेणे गाव सद्या कंटेनमेंट झोन मध्ये असून कोरोनाची खबरदारी म्हणून यंदा आषाढी एकादशीचा सोहळा व सर्व कार्यक्र म रद्द करण्यात आले असल्याची माहिती दत्त मंदिर संस्थांनचे अध्यक्ष महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर , अर्जुनराज सुकेणेकर , बाळकृष्णराज सुकेणेकर , राजधरराज सुकेणेकर ,गोपीराज शास्त्री सुकेणेकर यांनी दिली.-------------------मंदिर उघडणार नाहीजो पर्यंत सरकारी सूचना येत नाही तोपर्यंत मौजे सुकेणे येथील दत्त मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार नाही. भाविकांनी संस्थानच्या पुढील सूचनेपर्यंत दर्शनासाठी येऊ नये , असे आवाहन सुकेणेकर संत परिवाराने केले आहे.--------------------कोरोना संसर्ग खबरदारी म्हणून यंदाचा आषाढी एकादशी सामूहिक देवपूजा वंदन सोहळा रद्द केला आहे. मंदिर सद्या बंद असून सरकारी सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनानुसार मंदिर खुले केले जाईल.- पूज्य गोपीराज शास्त्री सुकेणेकर , दत्त मंदिर संस्थान
यंदाचा आषाढी एकादशी देवपूजावंदन सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:38 IST