शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही गणवेशाविनाच सुरू होणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:52 IST

राज्य सरकारने गेल्यावर्षी शाळेत होणारे गणवेश वाटप बंद करून त्याकरिता डीबीटी पद्धत सुरू केली. मात्र या योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होऊ शकला नव्हता.

नाशिक : राज्य सरकारने गेल्यावर्षी शाळेत होणारे गणवेश वाटप बंद करून त्याकरिता डीबीटी पद्धत सुरू केली. मात्र या योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी शासनाने डीबीटीला फाटा देत यंत्रणेतील अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा महापालिके च्या माध्यमातून शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली आहे. परंतु, निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातही गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशाविनाच शाळेत जावे लागणार आहे.नाशिक महापालिकेच्या शहरात एकूण ९० शाळा असून, अनुदानित ८१ शाळा आहेत. यातील महापालिकेच्या सर्व शाळांमधील सर्व मुलींसह अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व मुलांना शासनाकडून गणवेशाचा पुरवठा केला जातो. तर उर्वरित विद्यार्थ्यांना नाशिक महानगरपालिकेकडून गणवेश उपलब्ध करून दिले जातात.मात्र यावर्षी विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसंदर्भात शासनाचा निर्णय होण्यास विलंब झाला असून, महापालिकेलाही निधी विलंबाने प्राप्त झाल्यामुळे आतापर्यंत शासकीय योजनेतून गणवेश प्राप्त होऊ शकलेले नाही. तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी महापालिकेकडूनही तरतूद झालेली नसल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच शाळेत जावे लागणार आहे.दरम्यान, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय शाळांना शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, सर्व विद्यार्थ्यांना शालेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांनी सांगितले.शासनाकडून १ कोटी ४० लाखांचा निधीमहापालिकेच्या शाळांमधील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी महापालिकेकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, या माध्यमातून शहरातील सुमारे २७ हजार विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मिळणार आहे. मात्र, गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली जाणार असल्याने यावर्षीही विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली असून, विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळण्यासाठी किमान पंधरा दिवस ते एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी