शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पर्युषण पर्व साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:09 IST

चांदवड / लासलगाव : ऋषिपंचमी-पासून (दि.२३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने चांदवड आणि लासलगाव येथील जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. या काळात भाविकांसाठी सामाजिक अंतर राखून दर्शन दिले जाणार असल्याचे समाजबांधवांकडून सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्दे पर्यषण पर्वात प्रवचनाचे कुठलेही कार्यक्रम आयोजित केले नाही.

 

उपक्रम : चांदवड, लासलगावी भाविकांसाठी दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड / लासलगाव : ऋषिपंचमी-पासून (दि.२३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने चांदवड आणि लासलगाव येथील जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. या काळात भाविकांसाठी सामाजिक अंतर राखून दर्शन दिले जाणार असल्याचे समाजबांधवांकडून सांगण्यात आले आहे.चांदवड येथे समरथ-गच्छाधिपती प.पू. श्री. उत्तममुनीजी म.सा. यांच्या आज्ञानुवर्ती साध्वी प.पू. श्री. ताराजी म.सा., प.पू. श्री. निताजी म.सा., प.पू. श्री. अंजलीजी म.सा., प.पू. श्री. प्रांजलजी म.सा. आदींचे चांदवड शहरात आगमन झाले आहे. रेणुकानगर येथील सुधर्मा आराधना केंद्र येथे चतुर्मासानिमित्त त्यांचे वास्तव्य आहे, तर पर्यषण पर्वात प्रवचनाचे कुठलेही कार्यक्रम आयोजित केले नाही. केवळ जैन समाज बांधव व भगिनी यांना दर्शनासाठी येण्याची मुभा आहे, तीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच कोणतेही धार्मिक प्रवचन होणार नसल्याचे समरथ- गच्छाधिपती या जैन बांधवांच्या वतीने सांगितले तर त्यांची आहार-विहाराची व्यवस्था जैन समाज बांधवाच्या घरी जाऊन फिजिकल डिस्टन्सिंग पालन करून केली जाणार आहे.दरम्यान, श्री वर्धमान-स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या केंद्रात व श्री श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघाच्या स्थानकात कुणीही साध्वी, मुनी आलेले नाही.लासलगाव येथील जैन स्थानकामध्ये चतुर्मासानिमित्त प.पू. डॉ. प्रियदर्शनाजी म.सा., प.पू. डॉ. प्रणवदर्शनाजी म.सा., प.पू. विरलदर्शनाजी म.सा. व प.पू. इशदर्शनाजी म.सा. यांचे लासलगावी आगमन झाले आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे प्रवचनाचा मोठा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.चतुर्मासात येणाऱ्या जैन मुनींबाबत भाविकांना उत्सुकता असते. त्यांचे मार्गदर्शन आणि संत सहवास हा फार मोठा ठेवा मानला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे अशा उपक्रमांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कार्यक्रम होणारच नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र