शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

यंदा २५ टक्केच द्राक्ष निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:14 IST

जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका बसला असून, साडेतीन लाख मेट्रिक टन द्राक्ष पडून असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ यंदा केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. मागील वर्षी २०१८-१९ साली २ लाख ४६ हजार १३३ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीनंतर भारताला मिळालेले २३३५ कोटी रुपयांचे परकीय चलन घटून मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केच मिळेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : तीन लाख मेट्रिक टन माल पडून, उत्पादक धास्तावले

शेखर देसाई।लासलगाव : जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका बसला असून, साडेतीन लाख मेट्रिक टन द्राक्ष पडून असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ यंदा केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.मागील वर्षी २०१८-१९ साली २ लाख ४६ हजार १३३ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीनंतर भारताला मिळालेले २३३५ कोटी रुपयांचे परकीय चलन घटून मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केच मिळेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कधी अवकाळी तर तर अस्मानी संकटाचा सामना करणारे द्राक्ष बागायतदारांना यावर्षी चांगले दर मिळण्याची शक्यता आता कोरोनामुळे धुळीस मिळाली आहे. त्यामुळे देशाला आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. नाशिक जिल्हा द्राक्षाचे आगारच आहे. निर्यातक्षम द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.नाशिक जिल्हा व परिसरामध्ये अजूनही ६० हजार एकरच्या जवळपास द्राक्षबागा तयार असून साधारणत: साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन द्राक्ष अजूनही पडून आहे. कोरोनामुळे मजुरांअभावी द्राक्ष निर्यात पूर्णत: कोलमडली असून निर्यातक्षम द्राक्ष २० ते २२ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, मात्र इतके कमी दर असूनही द्राक्षाला ग्राहक नसल्याने शेतकºयांना या द्राक्षाचे बेदाणे करावे लागत आहे.संचारबंदी असल्याने मजूर मिळणे कठीणनाशिक जिल्ह्यातून १८ देशांमध्ये आतापर्यंत द्राक्षाची निर्यात करण्यात आलेली आहे. द्राक्ष पंढरी असलेल्या जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपत आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे. देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. यंदाच्या हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यातून ८३ हजार ५०० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातील द्राक्षे सातासमुद्रापार असणाºया अनेक देशात निर्यात होतात. परिसरातील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांवर मात करून गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेतात. यावर्षी तर अवकाळीमुळे निर्माण झालेले खराब वातावरण अशी प्रचंड मेहनत घेत शेतकºयांनी निर्यातक्षम द्राक्षबागा वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यातच कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने डोके वर काढल्याने त्याचा द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसतो आहे. मागील ४ एप्रिलपर्यंत वर्षी जिल्ह्यातून १ लाख ९ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती, मात्र या कोरोना संकटामुळे यंदा द्राक्ष निर्यात रोडावली असून, मोठ्या प्रमाणात द्राक्ष हे बागेतच पडून आहेत.देशभरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने द्राक्षासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. बागायतदारांकडे असलेले मजूर भीतीपोटी निघून गेले आहेत. द्राक्ष काढण्याबरोबरच पॅकेजिंगसाठीदेखील कामगार लागतात, मात्र संचारबंदीमुळे पाचपेक्षा अधिक कामगार जमण्यास परवानगी नसल्याने त्याचीदेखील अडचण निर्माण झाल्यानेच याचा फटका द्राक्षबागेला बसला आहे.- जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघवर्षनिहाय द्राक्ष निर्यात व मिळालेले परकीय चलन२०१५-१६ - १३२६४७ मेट्रिक टन - १३६२.२७ कोटी२०१६-१७ - १९८४७१ मेट्रिक टन - १७८१.७१ कोटी२०१७-१८ - १८८२२१ मेट्रिक टन - १९०० कोटी२०१८-१९ - २४६१३३ मेट्रिक टन - २३३५ कोटी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार