शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

गतवर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:47 IST

गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जमाफी फोल ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

नाशिक : गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जमाफी फोल ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, चालू वर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे दहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.  गेल्या वर्षी जिल्ह्णात सर्वत्र समाधानकारक पर्जन्यमान होऊन खरीप हंगामाची पीक पैसेवारी ५० पैशांहून अधिक नोंदविली गेली होती. शिवाय जिल्ह्यातील धरणेही शंभर टक्के फुल्ल होऊन नद्या, नाले दुथडी भरून वाहिले त्यामुळे शेतकºयांना ‘अच्छे दिन’ आल्याची अपेक्षा व्यक्त केली गेली. त्यातच राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान योजना लागू करून कर्जदार शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले. नाशिक जिल्ह्णातील सुमारे ९० हजारांच्या आसपास शेतकºयांना याचा लाभ मिळाला. असे असतानाही शेतकºयांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना सन २०१७ मध्ये डिसेंबरअखेर १०४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. तोच कित्ता चालू वर्षीही सुरू असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्णात २३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गत वर्षाच्या तुलनेत सातने संख्येत वाढ झाली आहे. गत वर्षी जानेवारी ते मार्च या काळात १६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र संख्या २३ वर पोहोचली आहे. चालू वर्षी जानेवारीत ९, फेब्रुवारी ४ व मार्च महिन्यात दहा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने प्रशासन यंत्रणाही हादरली आहे.घोषणा हवेतचजिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता कर्जमाफीची मात्रा शेतकºयांना फारशी लागू पडली नसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसाने घातलेले थैमान, गारपीट, कापसावरील बोंडअळी यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून, कांद्याच्या भावात दरदिवसा घसरण होऊ लागली आहे तर मक्याचे अमाप पीक येऊनही पाहिजे त्याप्रमाणात दर न मिळाल्याने नाराजी आहे. द्राक्षपिकावर हवामानाचा परिणाम झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी जवळचा मार्ग म्हणून आत्महत्येला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्या रोखण्याची जिल्हा प्रशासनाची घोषणाही हवेतच विरली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या