शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गणेशोत्सवावरही दिसणार कोरोनाचे सावट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:31 IST

गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे.

नाशिक : हातावर पोट असणाऱ्या कामगारांबरोबरच गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांनाही कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे देखावे तयार करणाऱ्या शिल्पकांरांच्या व्यावसायिकांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉकडाऊनमुळे गुजरातमधून येणारा कच्चा माल येण्यास विलंब होत आहे. रेड झोन वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊनची नियमावली शिथिल करण्यात आली असली तरी व्यावसायिकांकडे कच्चा मालच उपलब्ध होत नसल्याने पुरवठा करण्यात अडचणी येत होता. आता हळूहळू कच्चा मालाचा पुरवठा होऊ लागला असला तरी वाढलेला वाहतूक खर्च व मनुष्यबळ यामुळे मूर्तिकारांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या तीन-चार महिने आधी मूर्तिकार कामास सुरुवात करतात. यंदाचा गणेशोत्सव २२ ऑगस्टला सुरू होणार आहे; परंतु मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालच कारागिराकडे नाही. शाडूची माती, प्लास्टर आॅफ पॅरिस, मातीमध्ये मिसळण्यासाठी काथ्या हा कच्चा स्वरूपातील माल गुजरात व राजस्थान येथून मागविला जातो. त्याचबरोबर लागणारे रंग मुंबई येथून आणले जाते. या कामाला दरवर्षी एप्रिलपासूनच सुरुवात होते; परंतु यंदा मूर्ती तयार करण्यासाठी हाताशी काचा माल वेळीच उपलब्ध झाला नसल्याने सध्या जवळ असलेल्या मातीतूनच मूर्ती साकारल्या जात असल्या तरी ती संख्या कमी आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीEmployeeकर्मचारीTrafficवाहतूक कोंडी