शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

‘एड्स’बाधितांच्या पुनर्वसनासाठी यश फाउंडेशनचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:00 IST

एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे धेय्य समोर ठेवून एड्स जनजागृतीची मोहीम हाती घेतलेल्या यश फाउंडेशनने मंगल मैत्री मेळाव्याच्या माध्यमातून गत दशकभरात विविध ३७ एचआयव्ही बाधित जोडप्याचे संसार जुळवले आहे. एचआयव्हीचे निदान झाल्यानंतर विवाह इच्छुकवधू-वरांकरिता जिल्हास्तरीय मंगल मैत्री मेळाव्याचे आयोजन करून संस्थेने हे विवाह यशस्वी करून एड्सबाधितांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे.

नाशिक : एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे धेय्य समोर ठेवून एड्स जनजागृतीची मोहीम हाती घेतलेल्या यश फाउंडेशनने मंगल मैत्री मेळाव्याच्या माध्यमातून गत दशकभरात विविध ३७ एचआयव्ही बाधित जोडप्याचे संसार जुळवले आहे. एचआयव्हीचे निदान झाल्यानंतर विवाह इच्छुकवधू-वरांकरिता जिल्हास्तरीय मंगल मैत्री मेळाव्याचे आयोजन करून संस्थेने हे विवाह यशस्वी करून एड्सबाधितांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे.आज हे सर्व जोडपे आनंदाने वैवाहिक आयुष्य जगत असून अगदी लहान वयातच एड्सच्या विळख्यात अडकलेल्या चिमुकल्यांनाही संस्थेने नव्याने जगण्याची ऊर्जा दिली आहे. सकस आहार योजनेच्या माध्यमातून त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्तीसोबतत जगण्याची उमेद वाढविण्याचे कामही संस्थेने हाती घेतले आहे.  आर्थिक बळ असेल तर येणाºया परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ आपोआपच मिळते. त्यामुळे एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºया व्यक्तींना मानसिक आधारासोबतच स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत:ला व कुटुंबाला आधार देण्याची गरज असते. ही गोष्ट लक्षात घेऊन संस्थेने अनेक महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºया महिलांनी एकत्र येऊन ५ बचत गट तयार केले असून, ५६ महिला या बचत गटात सहभागी झाल्या आहेत. याद्वारे या महिला आपल्यासारख्या गरजू महिलांना आर्थिक सहाय्य करीत आहेत. तसेच संस्थेच्या मंगल मैत्री मेळाव्याच्या माध्यमातून ३७ जोडपे विवाह बंधनात अडकले असून, या मेळाव्याकरिता महाराष्ट्र राज्यातील ४१२ वधू-वरांची नोंदणी झालेली आहे. यांनाही वैवाहिक जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी यश फाउंडेशन महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या सहकार्यने कार्यरत असून, एड्सचा प्रसार रोखण्यासाठीही संस्थेकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.स्थलांतरित कामगार, ट्रकचालक, क्लिनर आदी घरांपासून परिवारापासून अधिक काळासाठी दूर राहतात. ते शारीरिक गरजेपोटी एक किंवा अनेक व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवतात व एड्सला बळी पडतात. त्यामुळे नकळत संसर्ग पसरतो. या गटावर विशेष केंद्रित करीत आरोग्य शिबिरे, गुप्तरोग व एचआयव्हीची तपासणी, पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रकांच्या माध्यमातून स्थलांतरित गटातील नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचा ध्यास प्रकल्पाच्या माध्यमातून संस्थेने घेतला आहे. - रवींद्र पाटील, अध्यक्ष, यश फाउंडेशनखबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शनमुंबई, पुणे पाठोपाठ मोठे शहर म्हणून विकसित होणाºया नाशिक शहरातही एच.आय.व्ही./एड्स आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर समोर येत एच.आय.व्ही./एड्स प्रसाराची भीती लक्षात घेता प्रतिबंध हाच या आजारावर एकमेव उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एचआयव्हीविषयी योग्य महिती असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन शहरातील विविध बचत गट, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय आदींच्या सहकार्याने यश फाउंडेशनने गेल्या आठ वर्षांपासून वेगवेगळ्या वस्ती पातळीवर जनजागृतीचे काम सुरू केले आहे. एड्स तथा एचआयव्हीविषयी जनजागृतीच्या दृष्टीने विविध चर्चा सत्र, प्रशिक्षण, पथनाट्य यांद्वारे एचआयव्ही प्रतिबंध हाच या आजारावर उपचार असल्याचे समजावून सांगतानाच एचआयव्हीची बाधा होण्यापासून वाचण्यासाठी कोण कोणती खबरदारी घ्यायची याविषयी यश फाउंडेशकडून मार्गदर्शन केले जात आहे.मुलांसाठी सकस आहाररोगप्रतिकारकशक्ती कायम ठेवण्यासाठी आणि घेत असलेल्या उपचारासाठी एचआयव्ही सहजीवन जगणाºया मुलांना सकस आहार हा अत्यंत आवश्यक आह. हे लक्षात घेऊन संस्थेने २००७पासून सकस आहार कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. सुरुवातीला १५ मुलांसोबत सुरू केलेली ही योजना आता २०० मुलांपर्यंत पोहोचली असून, दर महिन्याला संस्थेमार्फ त या मुलांना सकस आहार देण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवक