शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

By श्याम बागुल | Updated: October 31, 2018 14:49 IST

राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पुर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पुर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉंग्रेसने केली होती.

ठळक मुद्देचार वर्षपुर्ती : सकाळी योगासने करून घोषणाबाजी

नाशिक : राज्य सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढणारी वेगवेगळ्या प्रकारची बारा आसने करून उपस्थितांचे मनोरंजन केले.राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पुर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पुर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉंग्रेसने केली होती. केंद्र व राज्य सरकारला योगाची भाषा अधिक कळ ते त्यामुळे योगाच्या माध्यमातूनच निषेधासन करून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता गोल्फ क्लब मैदानावर जमलेल्या कॉँग्रेसजनांची अगोदर राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून मैदानात आसने करण्यास सुरूवात केली. त्यावेळी ‘कर्जमाफी कधी मिळणार, अभ्यास सुरू आहे’, ‘रोजगार कधी मिळणार, अभ्यास सुरू आहे’अशा प्रकारची उपहासात्मक घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून शेतकºयांच्या हितासाठी सरकारला सुुबूद्धी मागणारी प्रार्थना करण्यात आली. या आंदोलनात कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, उद्धव पवार, सुरेश मारू, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील आदी सहभागी झाले होते.

 

चौकट===अशी केली निषेधासन...मराठा, धनगर आरक्षण, शेतक-यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अभ्यासासन; फसवी कर्जमाफी, शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकाच्या विषयी घोषणासन किंवा गाजरासन; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना क्लिनचिट दिल्याने क्लिनचिटासन; शेतक-यांविषयी अपशब्द काढणा-या मंत्र्यांच्या विरोधात वाचाळासन; महामार्ग कमी न केल्याच्या निषेधार्थ महागाईसन; रोजगार निर्मिती न केल्याच्या प्रश्नावर बेरोजगारासन; अंधभक्तांसाठी भक्तासन; सोशल माध्यमातील पेड ट्रोलाच्या विरोधात ट्रोलासन; खोटे आश्वासन दिल्याने फसवणीसासन; प्रत्येक पश्नावर दिल्या जाणा-या धमकीच्या निषेधार्थ धमकीआसन; दुष्काळ प्रश्नी सदृष्य शब्द वापरल्याने अंशत: सन; राफेल प्रकरणात अंबानीला मदत केल्याने राफेलासन यावेळी करण्यात आले. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक