शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

न्यायालयाच्या निर्णयाचा मनपाकडून चुकीचा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:04 IST

सिडको : विद्यमान सरकार, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या हॉटेल दारूबंदीला उठवून मार्ग काढू शकते, तर ...

सिडको : विद्यमान सरकार, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या हॉटेल दारूबंदीला उठवून मार्ग काढू शकते, तर ज्या मंदिरांच्या नावावर केंद्रात, राज्यात सत्ता मिळविली तसाच निर्णय धार्मिक स्थळांसाठी का घेऊ शकत नाही, असे सांगून धार्मिक स्थळासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचा महापालिकेने चुकीचा अर्थ काढल्याचा आरोप याचिकाकर्ते दिलीप दातीर यांनी केला आहे.सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या धार्मिक स्थळांबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडे दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने मे २०११ व दि. नोव्हेंबर २०१५ मध्ये संयुक्तिकपणे शासन निर्णय पारीत केला़ सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेल्या सरकारी मालमत्तेवर उभारलेल्या तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असलेली धार्मिक स्थळे हे अनधिकृत स्वरूपात मोडत असल्याने ते पाडून टाकण्याबाबतचे आदेश दिले होते.मात्र, सदर आदेशाचा व न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ घेत नाशिक मनपाने सार्वजनिक जागेत उभारलेल्या धार्मिक स्थळांना नोटिसा देऊन ते पाडण्याचे काम सुरू केले होते. तसेच मंजूर अभिन्यासातील खासगी मालमत्ता असलेल्या खुल्या जागेत मनोरंजनाचे किंवा मन:शांतीचे ठिकाण म्हणून उभारलेल्या धार्मिक स्थळांवरदेखील पाडून टाकण्याची कार्यवाही सुरू केली होती. सदर दाव्यांमध्ये उच्च न्यायालयाने निर्णय देत मनपाने सदरची धार्मिक स्थळे ही सार्वजनिक जागेत बांधल्याबाबतची प्रथम खात्री करावी व तद्नंतरच पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश केलेले आहेत. मात्र शासनाने त्यावर अद्याप निर्णय का घेतला नाही? तसेच याबाबत सरकार व शासन नाशिककरांची फसवणूक करत असल्याचा आरोपही दातीर यांनी केला असून, जर मनपाने ३७/१ ची कार्यवाही पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला असताना व शासनाला अधिकार असतानाही शासन मान्यता का देत नाही, असा प्रश्नही दातीर यांनी यावेळी उपस्थित केला.विविध दावे दाखलया बेकायदेशीर कृत्याचा विरोध करत मंजूर अभिन्यासातील खुली जागा या खासगी मालमत्तेतील कोणतेही धार्मिक स्थळ पाडण्यात येऊ नये यासाठी याचिकाकर्ते दिलीप दातीर व भागवत आरोटे यांनी एकत्रितपणे उच्च न्यायालयात विविध दावे दाखल केले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको