शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वीजमीटर बदलण्यासाठी लावतात चुकीचे निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:48 IST

ग्राहकाला येणारे वीज बिल आणि मीटर रिडिंगबाबत शंका आल्यास स्थानिक पातळीवरील वीज कर्मचारी ग्राहकाला वीजमीटर बदलण्याचा परस्पर सल्ला देतात. यामुळे ग्राहकाला नाहक भुर्दंड सहन करावा लागतोच

नाशिक : ग्राहकाला येणारे वीज बिल आणि मीटर रिडिंगबाबत शंका आल्यास स्थानिक पातळीवरील वीज कर्मचारी ग्राहकाला वीजमीटर बदलण्याचा परस्पर सल्ला देतात. यामुळे ग्राहकाला नाहक भुर्दंड सहन करावा लागतोच शिवाय वीज कार्यालय आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या नाहक हातापाया पडण्याचीही वेळ येते. एव्हढे करूनही वीजमीटर वेळेत मिळत नसल्याचा सर्वसामान्य ग्राहकांचा अनुभव असताना महावितरणनेच आता अशा कर्मचाऱ्यांची ही मनमानी उघड केली आहे. मीटर बदलण्याचे निकष हे प्रमाणित नसतानाही कर्मचारीच चुकीचे निकष लावून मीटर बदलत असल्यास यापुढे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे संकेत मुख्यालयाने दिले आहेत.ग्राहकांबरोबरच सुसंवाद निर्माण करण्यासाठी महावितरणकडून अनेकविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. विशेषत: ग्राहकांचे वीज बिल आणि मीटर रिडिंगबाबतच्या तक्रारी कमी करण्यासाठी अनेक योजना महावितरणकडून राबविण्यात आलेल्या आहेत. वेळोवेळी या यंत्रणा सक्षम करण्यासाठीच्या आधुनिक यंत्रणादेखील राबविण्यात आलेल्या आहेत. असे असले तरी ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचे प्रकार समोर येतात. त्याचा भाग म्हणजे वीजमीटर बदलणे हा एक आहे.महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया स्थानिक पातळीवरील शाखा कार्यालयामार्फत करण्यात येते. यामध्ये मीटर बदलण्याचे निकष हे प्रमाणित नसल्याने सदर मीटरमीटर संदर्भातील गैरप्रकाराला पुष्टीवीजमीटर संदर्भात ग्राहकांना तांत्रिक माहिती असणे शक्य नाही किंवा त्याचे तसे कारणही नाही. महावितरणच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचाºयांने मीटर बदलण्याचे सांगितल्यास ग्राहकाला तसे करणे भाग पडते. ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आल्याचा अहवाल फुगवून मुख्यालयाकडे पाठविण्यामागेदेखील मोठे षडयंत्र असल्याचे प्रथमदर्शनी समोर आलेले आहे. त्यामुळे यापुढे मीटर बदलण्याची प्रक्रिया यापुढे केंद्रीय प्रणालीनुसारच होणार आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक