कसबे सुकेणे : दिवंगत माजी आमदार मालोजीराव मोगल यांना मौजे सुकेणे सोसायटी व ग्रामपंचायत यांच्या वतीने नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात आली.मौजे सुकेणे येथील विविध संस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मौजे सुकेणे गावाच्या विकासाचा पाया मोगल यांनी रचला होता. त्यांच्या निधनाने मौजे सुकेणेकर पोरके झाले असून, गावाचा मार्गदर्शक हरपला असल्याच्या शोकभावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. दत्त मंदिर संस्थान, सहकारमहर्षी काकासाहेब मोगल सार्वजनिक वाचनालय, शेतकरी युवक मित्रमंडळ, मौजे सुकेणे ग्रामपंचायत, विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी मौजे सुकेणेचे सरपंच किशोर सहाळे, उपसरपंच विजय मोगल, सोसायटीचे उपाध्यक्ष भरत रहाणे, मविप्रचे माजी संचालक प्रतापराव मोगल, वाचनालयाचे संग्राम मोगल, दत्त मंदिर संस्थानाचे मनोहरशास्त्री सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, निफाड तालुका ग्राहक भांडार संघाचे संचालक भाऊसाहेब चव्हाण आदि उपस्थित होते. मोगल सहकारी पतसंस्थाकसबे सुकेणे येथील सदाशिवराव मोगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनेही मोगल यांना शद्धांजली वाहण्यात आली. सहकार क्षेत्र एका मार्गदर्शकाला मुकला असल्याचे मोगल पतसंस्थेचे अशोक रंगनाथ भंडारे यांनी सांगितले. संस्थेचे सुहास भंडारे, लक्ष्मण भंडारे, राजाराम भंडारे यांच्या हस्ते मोगल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत दात्याणे यांच्या वतीनेही मोगल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सरपंच प्रतिभा धनवटे, उपसरपंच कमळाबाई गुरगुडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. काकासाहेब मोगल कल्याणकारी शैक्षणिक संस्थेच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष पी. ए. पाटील यांच्या हस्ते मोगल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चांदोरी ग्रामपालिकेच्या वतीनेही मोगल यांना शद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच विजय बागस्कर होते. यावेळी उपसरपंच पुष्कर हिंगणे व ग्रामस्थ सदस्य उपस्थित होते. कसबे सुकेणे , मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, चांदोरी, भाऊसाहेबनगर येथील विविध संस्थांच्या वतीनेही मोगल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.(वार्ताहर)संगमेश्वर अजिंठा शाळेत विविध वस्तूंचे वाटपमालेगाव : येथील संगमेश्वरातील अजिंठा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना अमेरिकेहून आणलेल्या विविध वस्तंूचे (सॅमेरिटन बॉक्स) वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त अजित जाधव होते. येथील सारा फाउंडेशनतर्फे आॅपरेशन ख्रिसमस चाइल्ड उपक्रमांतर्गत या बॉक्सेसचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष सखाराम घोडके, सारा फाउंडेशनचे विजय खरे, सुनेत्रा मेश्रामकर, यशवंत लिंगायत, विश्वस्त, सुभाष सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
मौजे सुकेणे ग्रामस्थांनी वाहिली मोगल यांना श्रद्धांजली
By admin | Updated: July 17, 2014 00:53 IST