शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वणीत टमाटा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 18:30 IST

टमाटा दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. येथील कृषिमालास अपेक्षित भाव मिळण्याच्या आशा धूसर होत आहेत.

ठळक मुद्देखर्चही वसूल होत नसल्याने नाराजी

वणी : टमाटा दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. येथील कृषिमालास अपेक्षित भाव मिळण्याच्या आशा धूसर होत आहेत. टमाट्यापासून सॉस तयार करणाºया कंपन्यांकडे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून उत्पादकांनी धाव घेतली आहे.हंगामाच्या प्रारंभी टमाट्याला समाधानकारक दर मिळत होते. त्यामुळे उत्पादकांचा उत्साह दुणावला होता. उत्तरोत्तर भाव वाढण्याचा अंदाज वर्तविला जात असताना गेल्या काही दिवसांपासून टमाट्याच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत उत्पादक सापडले आहेत. परिसरात व तालुक्याच्या हजारो एकर शेतीक्षेत्रात टमाट्याची प्रचंड लागवड करण्यात आली होती. त्यामुळे मोठी आवक बाजारात झाली. मागणीत घट आली. परिणामी दर घसरणीवर झाला.लागवडीपासून उत्पन्नापर्यंतच्या खर्चाचा अंदाज बांधल्यास आजच्या दराने उत्पन्नाचा ताळमेळ बसणे अवघड आहे. टमाट्याची खुडणी व वाहतूक खर्चही अंगावर पडू लागला आहे. त्यामुळे सदरचा टमाटा सॉस तयार करणाºया कंपन्यांमध्ये विक्र ीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सॉस कंपनीत अत्यल्प दराने टमाटा विक्र ी व्यापाºयांच्या माध्यमातून नाइलाजाने करावी लागत असून, हंगामाच्या पूर्वार्धातील अपेक्षा दराच्या बाबतीत उत्तरार्धातही पूर्ण झालेल्या नसल्याने टमाटा उत्पादक हताश व निराश झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती