शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दुबई येथे विश्वशांती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:45 IST

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून अजमान, दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मोरे यांनी सेवेकऱ्यांशी हितगूज साधले.

नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून अजमान, दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मोरे यांनी सेवेकऱ्यांशी हितगूज साधले.या महोत्सवासाठी दुबई, अबुधाबी, शारजा, अजमान येथील स्थानिक अरबी, ख्रिश्चन, गुजराथी, मारवाडी, सिंधी व हिंदू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भारतातून देश-विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवली. सर्वप्रथम भूपाळी आरती, त्यानंतर विविध उपक्र मांचे आयोजन केले गेले. बालसंस्कारच्या मुलांनी मान्यवरांचे स्वागत दिंडी काढून केले. नितीन मोरे यांच्या स्वागतासाठी दुबई येथील प्रतिनिधी रवि काळे, अजमान येथील अरबी उद्योजक हसान खलिफा अल फुकाई, उद्योजक एल. जो. फर्नांडिस, चंद्रप्रताप, रचना महाजन आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवाातीला श्री स्वामी महाराजांच्या पादुकांसमवेत पवित्र कुराण ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या पादुका पूजनाचा स्थानिक मुस्लीम भाविकांनीदेखील लाभ घेतला.यावेळी नितीन मोरे यांनी, मानवी जीवनातील विविध पैलूंची सेवामार्गाशी कशी सांगड घातली आहे, हे आपल्या हितगुजातून स्पष्ट केले. प्रत्येक धर्मातील पवित्र ग्रंथ एकत्र राहण्याची व एकमेकांना आधार देण्याचीच शिकवण देतात. स्वामी महाराजांनी विश्वभ्रमंती करून प्रत्येक धर्मातील शिष्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून समाज उद्धाराचे कार्य करून घेतले आहे.या कार्यात बालसंस्कार विभागाला खूप महत्त्व आहे. गुरूमाउलींनी या सर्व विभागाची प्रशिक्षणे व विविध समाजोपयोगी संशोधने करण्याठीच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ गुरु पीठाची स्थापना केली आहे. सेवामार्गाच्या विविध विभागांचे मार्गदर्शन स्लाईड शो च्या माध्यमातून करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम