शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

जागतिक दर्जाचे द्राक्षवाण आरा-३२ भारतात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 13:12 IST

दिंडोरी : प्रतिकूल परिस्थितीतही सक्षम राहण्यात आणि गोड चवीचे उत्पादन देण्यासाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिध्द आहेत. यातील काळ्या रंगाचा ‘आरा-३२’ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे द्राक्ष उत्पादकांना दिलासा : पावसासह प्रतिकूल हवामानास प्रतिकारक्षम, निर्यातीसाठी सर्वोत्तम

दिंडोरी : प्रतिकूल परिस्थितीतही सक्षम राहण्यात आणि गोड चवीचे उत्पादन देण्यासाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिध्द आहेत. यातील काळ्या रंगाचा ‘आरा-३२’ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला आहे. ‘आरा-१५’चे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर ‘आरा ३२’ हे पुढचे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर मंगळवारी या वाणाचे सीडलींग्स आणण्यात आले. राज्यातील द्राक्ष उत्पादकांना मागील अनेक वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ही शेतीच संकटात सापडली आहे. ‘आरा’ सारखे जागतिक दर्जाचे वाण अशा प्रतिकूल हवामानातही खात्रीचे आणि दर्जेदार उत्पादन देतात हे आतापर्यंत दिसून आले आहे. त्या पाशर््वभूमीवर या वाणांची आयात करु न द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्यातक्षम ‘आरा’ या जागतिक वाणाचे सर्वाधिक अधिकार मिळाल्याने केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांना विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.द्राक्षाच्या सुप्रसिध्द ‘आरा’ या कॅलिफोर्नियातील द्राक्ष वाणांच्या श्रेणीचे भारतातील उत्पादन आणि विक्र ीचे सर्वाधिकार सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला मिळाले आहेत.सहा खंडांमधील २४ देशांत ‘आरा’ जातीची द्राक्षे उत्पादित केली जातात. भारताचा समावेश आता या देशांमध्ये झाला आहे. भारतातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यास ‘आरा’ वाणांमुळे फायदा होणार आहे. या पेटंटेड ‘आरा’ टेबल ग्रेप्सच्या (खाण्याची द्राक्षे) व्हाईट, रेड आणि ब्लॅक या तीन प्रकारांत एकाहून एक सरस अशा निर्यातक्षम जाती आहेत.द्राक्षे उत्पादन आणि विक्र ीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्र मांकाचे राज्य आहे. ‘आरा’ वाणांमुळे आगामी काळात राज्याच्या आणि अर्थातच ‘ग्रेप कॅपिटल’ समजल्या जाणाºया नाशिकच्या द्राक्ष उत्पादन क्षेत्रात क्र ांतिकारी बदल अपेक्षति आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक