शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
3
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
4
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
5
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
6
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
7
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
8
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
9
१३ दागिन्यांची दुकाने, ६ रेस्टॉरंट्स आणि ४ सुपरमार्केटचा मालक, तरीही दररोज चालवतात टॅक्सी; का?
10
T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड
11
उत्तर-दक्षिण ते पूर्व-पश्चिम; 2026 मध्ये देशाला मिळणार चारही दिशा जोडणारे 8 नवे एक्सप्रेसवे
12
"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
14
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
15
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
16
नव्या वर्षात मुंबई, कोकण, पुण्यात म्हाडाची लॉटरी; आचारसंहिता संपताच प्रक्रियेला वेग 
17
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
18
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
19
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
20
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक सायकलचालकांचा सन्मान नाशिक सायकलिस्ट : कॉलेजरोड परिसरातून सायकलफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:27 IST

नाशिक : शहरात सायकल चळवळ अधिकाधिक रुजली असून, सायकलचळवळीचा विकास व्हावा, यासाठी विविध कार्यक्र मांमधून सातत्याने समाजापुढे नाशिककर ‘सायकल’ आणण्याचा प्रयत्न करतात.

ठळक मुद्देमहात्मानगर मैदान येथे मोठ्या संख्येने श्रमिक पुरुषसायकलस्वारांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला

नाशिक : शहरात सायकल चळवळ अधिकाधिक रुजली असून, सायकलचळवळीचा विकास व्हावा, यासाठी विविध कार्यक्र मांमधून सातत्याने समाजापुढे नाशिककर ‘सायकल’ आणण्याचा प्रयत्न करतात. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सकाळी शहरातील विविध श्रमिक सायकलचालकांची रॅली काढून सन्मान केला. श्रमकांची सायकल रॅली सकाळी ८ वाजता महात्मानगर मैदानापासून सुरू झाली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, किरण चव्हाण, डॉ. मनीषा रौंदळ यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. महात्मानगर मैदान येथे मोठ्या संख्येने श्रमिक पुरुष, महिला सायकलींसोबत एकत्र आल्या. दरम्यान, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी श्रमिकांच्या या सायकल रॅलीला झेंडा दाखवून उत्साहात प्रारंभ केला. कॉलेजरोड, गंगापूर रोडवरून रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीनंतर सहभागी श्रमिक सायकलस्वारांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. घरकाम करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या अनेक महिला कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. सायकलिंगचा प्रचार करताना प्रामुख्याने या महिलांचा सत्कार होणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे रॅली काढण्याचा विचार झाल्याचे नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी सांगितले. यासाठी गौरी समाज कल्याण संस्थेच्या रोहिणी नायडू यांचे सहकार्य मिळाले. दरम्यान, नाशिकमध्ये सुरू असलेल्या या सायकल चळवळीला गती देण्यासाठी आता पुढचे पाऊल म्हणून दहा विभागांत दहा प्रमुख कमिटी काम करेल अशी संकल्पना पुढे आली आहे. शहरातील दहा प्रमुख विभागांत एका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समितीचा संघ काम करणार आहे. या संदर्भात जबाबदारी स्वीकारणाºया सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांचा पदग्रहण सोहळा श्रमिक रॅली व सन्मान सोहळ्यानंतर पार पडला. त्याचप्रमाणे यावेळी नाशिक सायकलिस्ट पंढरपूर सायकल वारीसाठी आॅनलाइन नोंदणीचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.