शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कळसूबाई शिखरावर रोपवेसाठी कृतिशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 17:04 IST

छगन भुजबळ : शिष्टमंडळाला भेटीत दिले आश्वासन

ठळक मुद्देसंबंधित खात्याकडून समीक्षा करून निर्णय घेतला जाणार असून यामुळे कळसुबाई शिखर रोप वे योजनेमुळे विकासाचा अनुशेष भरून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घोटी : राज्यातील सर्वोच्च असलेले कळसूबाई शिखर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने शिखरावर महत्वाकांक्षी रोप वे योजनेच्या मंजुरीसाठी सरकार दरबारी कृतिशील असल्याचा शब्द राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी कळसुबाई मित्र मंडळाच्या शिष्टमंडळाला दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे आणि गिर्यारोहकांनी भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली.रोप वे योजनेमुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगार, पर्यटन समृद्धी यासह इगतपुरी, अकोले तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे. गत शासनामध्ये मंत्री असतांना भुजबळ यांनी कळसुबाई शिखरावर रोप वे योजना साकारण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र नंतर हा विषय रखडला होता. आता ह्या प्रकरणी संबंधित खात्याकडून समीक्षा करून निर्णय घेतला जाणार असून यामुळे कळसुबाई शिखर रोप वे योजनेमुळे विकासाचा अनुशेष भरून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता नव्या सरकारमध्ये भुजबळ हे महत्वपूर्ण मंत्री असल्याने रोप वे योजना साकारण्याबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा गिर्यारोहक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवा काळे, शाहीर बाळासाहेब भगत, अशोक हेमके, बाळा आरोटे, प्रवीण भटाटे आदींनी यासंदर्भात भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी रोप वे योजनेबाबत स्मरण असून योजना मंजुर करण्यासाठी कृतीशीलतेने योग्य तो निर्णय घेऊ असा शब्द भुजबळ यांनी दिला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनीही चर्चेत भाग घेऊन रोप वे योजनेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ