शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक ग्रामपंचायतीत पाच विहिरींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:30 IST

रोहयो : अपुर्ण विहिरींची कामे पूर्णत्वाचे आदेश

ठळक मुद्देराज्यात दुष्काळी स्थितीमुळे रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आलेली आहेत.

नाशिक : राज्यातील सध्याची दुष्काळी स्थिती लक्षात घेता महात्मा गांधी  ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एका ग्रामपंचायत हद्दीत एकाच वेळेस पाच विहिरींची कामे सुरू करण्याचे आदेश राज्याच्या नियोजन विभाग (रोहयो) सचिव एकनाथ डवले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.राज्यात दुष्काळी स्थितीमुळे रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आलेली आहेत. याशिवाय, रोहयोंतर्गत सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळी स्थितीमुळे राज्यात अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. याशिवाय, एका ग्रामपंचायत हद्दीत एकाच वेळी ५ विहिरींची कामे हाती घेण्याचे आदेशित करण्यात आले आहे. मात्र, याबाबत नियोजन करताना सध्या प्रगतीपथावर सुरू असलेल्या विहीरी विचारात घेऊन नवीन विहीरी मंजूर करण्याचे सूचित केले आहे. एका ग्रामपंचायतीत ३ विहीरींची कामे प्रगतीपथावर असल्यास त्या ग्रामपंचायत हद्दीत नव्याने दोन सिंचन विहिरींची कामे हाती घेण्याचे प्रस्तावित केले आहे. महात्मा गांधी राष्टय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच विहिरींची कामे सुरू करण्याचे आदेशित केल्याने त्या-त्या गावातील सिंचनाचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.अपूर्ण विहिरींना प्राधान्यग्रामपंचायत हद्दीत अपूर्ण राहिलेल्या विहिरींची कामे आधी प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या ग्रामपंचायत हद्दीत पाच पेक्षा जास्त विहिरी अपुर्ण असतील त्याठिकाणी नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, अशा सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक