शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

कामगारांच्या वारसांना आता ‘कॅशलेस मेडिकल

By admin | Updated: July 20, 2014 01:48 IST

कामगारांच्या वारसांना आता ‘कॅशलेस मेडिकल

 

’नाशिकरोड : आयएसपी-सीएनपी मधील १ नोव्हेंबर २००८ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना किंवा मृत झालेल्या कामगारांच्या वारसांना मुद्रणालय महामंडळाकडून आयएसपी हॉस्पिटलसह इनपॅनल हॉस्पिटलमध्ये ‘कॅशलेस मेडिकल सुविधा’ मिळवून देण्यास मजदूर संघाला यश आल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांनी दिली. आयएसपी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे, उपाध्यक्ष माधवराव लहांगे, ईपीएफ ट्रस्टी ज्ञानेश्वर जुंद्रे, सहसचिव सुनील अहिरे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर व देशातील इतर सात युनिटच्या पदाधिकाऱ्यांनी मुद्रणालय महामंडळ प्रशासनासोबत गेल्या अनेक दिवसांपासून सेवानिवृत्त कामगार व वारसांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळावी म्हणून प्रयत्न सुरू ठेवले होते. याबाबत मजदूर संघ पदाधिकारी व महामंडळ प्रशासनाच्या संयुक्त झालेल्या बैठकीत १ नोव्हेंबर २००८ पासून सेवानिवृत्त झालेल्या व मृत कामगारांच्या वारसांना आयएसपी हॉस्पिटलसह इनपॅनल हॉस्पिटलमध्ये कॅशलेस मेडिकल सुविधा देण्याचे मान्य करण्यात आल्याचे मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांनी सांगितले. ज्या कामगारांनी पेन्शनमध्ये ३०० रुपये वैद्यकीय भत्ता घेतलेला नाही, जे कामगार सी.जी.एच.एस. कार्ड घेऊन वैद्यकीय सुविधा घेत नाही अशा सर्व कामगारांना मुद्रणालय महामंडळ सेवानिवृत्त मेडिकल पॉलिसीचा लाभ मिळणार आहे. सी.जी.एच.एस. कार्डचा आॅप्शन घेणाऱ्या कामगारांना नियमाप्रमाणे शेवटच्या बेसिक व डी. ए. इतकी रक्कम भरावी लागणार आहे. इनपॅनल हॉस्पिटलची सुविधा घेणाऱ्या कामगारांना शेवटच्या बेसिक व डी.ए.ची रक्कम भरावी लागू नये म्हणून ग्रेड-पेप्रमाणे कमीत कमी रक्कम दहा वर्षांचा कालावधी धरून वन टाइम रक्कम भरून लाइफ टाइम कॅशलेश सुविधा मिळावी या मागणीप्रमाणे पॉलिसी मंजूर केली आहे.सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुढील महिन्यात स्वातंत्र्य दिनापासून पॉलिसीच्या अंमलबजावणीस प्रारंभ होणार आहे. सेवानिवृत्त कामगार व मयत कामगारांच्या वारसांनी येत्या सोमवारपासून मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आॅप्शन फॉर्म मजदूर संघाच्या प्रतिनिधीकडून घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)