कामगारांच्या प्रश्नी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 08:34 PM2020-07-25T20:34:19+5:302020-07-26T00:05:48+5:30

सातपूर : राज्यातील कामगारांच्या समस्यांबाबत लक्ष घालून कामगारमंत्र्यांबरोबर बैठक घ्यावी आणि कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Workers' questions | कामगारांच्या प्रश्नी साकडे

कामगारांच्या प्रश्नी साकडे

Next
ठळक मुद्देसीटूचे निवेदन। शरद पवार यांच्याकडे विविध मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : राज्यातील कामगारांच्या समस्यांबाबत लक्ष घालून कामगारमंत्र्यांबरोबर बैठक घ्यावी आणि कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेले खासदार शरद पवार यांना भेटून सीटूचे नेते डॉ. कराड यांनी हे साकडे घातले आहे. कामगार विषयक राज्यस्तरीय त्रिपक्षीय समित्यांवर राज्यातील कामगार संघटनेचे प्रत्येकी एक प्रतिनिधी घेऊन या समित्या गठीत कराव्यात व कामकाज सुरू करावे. कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी कामगार संघटना संयुक्तकृती समितीला आपण व कामगारमंत्र्यांनी वेळ द्यावा, अशी मागणी डॉ. कराड यांनी पवार यांच्याकडे केली आहे.राज्यात ऊसतोडणी कामगार, यंत्रमाग कामगार, रिक्षाचालक, टपरीधारक हॉकर्स अशा क्षेत्रांतील कामगारांचे कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी करून त्यांना कल्याणकारी योजना लागू करण्याबाबत निर्णय करावेत. बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नऊ हजार कोटीपेक्षा जास्त निधी शिल्लक आहे. त्या निधीतून दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे. आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची अंमलबजावणी करून त्यांची नोंदणी करावी, आदि मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Workers' questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.