शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
3
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
4
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
5
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
6
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
7
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
8
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
9
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
10
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
11
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
12
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
13
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
14
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
15
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
16
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
17
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
18
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
19
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
20
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

वर्क्स कमिटीत ‘कामगार’ला बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:11 IST

भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. आपला पॅनलला दोन्हीही मुद्रणालयांतून फक्त सात जागांवर विजय मिळाला आहे.

नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. आपला पॅनलला दोन्हीही मुद्रणालयांतून फक्त सात जागांवर विजय मिळाला आहे.  भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयात पहिल्यांदाच मजदूर संघ व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी घेण्यात आली. तसेच वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयात पहिल्यांदाच स्वतंत्र मतदान घेण्यात आले. निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले होते. दोन्ही मुद्रणालयांत सोमवारी आपापल्या विभागात वर्क्स कमिटी मतदानाची मतमोजणी करण्यात आली.आयएसपी विजयी उमेदवारआयएसपी प्रेसमध्ये कामगार प्रतिनिधी ११ व स्टाफ ३ अशा १४ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये कामगार प्रतिनिधीतून कामगार पॅनलचे बळवंत आरोटे (८४६), दत्तू गवळी (८२८), सचिन तेजाळे (८९५), भीमा नवाळे (८४१), अशोक पेखळे (८३८), मच्छिंद्र मगर (८१२), भाऊसाहेब सूर्यवंशी (८१४), बबन सैदपाटील (८०६), डॉ. चंद्रकांत हिंगमिरे (८९३), आपला पॅनलचे दगू खोले (७८५), बाळासाहेब चंद्रमोरे (८०४) हे विजयी झाले, तर स्टाफमधून आपला पॅनल - गयाप्रसाद शर्मा (१२२), कामगार पॅनलचे राहुल रामराजे (१७४), तुषार सावसाकडे (१४३) मते मिळवून विजयी झाले.सीएनपी विजयी उमेदवारसीएनपी प्रेसमध्ये वर्क्स कमिटी कामगार प्रतिनिधी १३ व स्टाफ २ अशा एकूण १५ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये कामगार पॅनलचे नंदू कदम (१०१२), संतोष कटाळे (९५७), योगेश कुलवदे (९४५), अरुण चव्हाणके (९०९), साहेबराव गाडेकर (८९१), दिनेश कदम (८८४), तुळशीदास पाटोळे (८७८), बाळासाहेब ढेरिंगे (८२७), संजय गरकळ (७८७), सुभाष ढोकणे (७८४), आपला पॅनलचे राजेंद्र शहाणे (८६६), हरिभाऊ ढिकले (८२७), अनिल जाधव (७७७) मते मिळवून विजयी झाले, तर स्टाफमधून आपला पॅनलचे रवींद्र गोजरे (१४१) व कामगार पॅनलचे विनोद ढेरिंगे (११७) मते मिळवून विजयी झाले.विजयाचा जल्लोषमजदूर संघापाठोपाठ वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत दोन्ही मुद्रणालयांत कामगार पॅनलने बाजी मारल्याने सोमवारी सायंकाळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून जोरदार विजयाचा जल्लोष साजरा केला.आपला पॅनलने सत्ता गमावलीगेल्या निवडणुकीत कामगार पॅनलने आयएसपीमध्ये व सीएनपीमध्ये आपला पॅनलने सत्ता मिळविली होती. मात्र यंदा दोन्ही मुद्रणालयांत कामगार पॅनलने वर्क्स कमिटीची सत्ता खेचून आणली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक