शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगार, कर्मचाऱ्यांनी केला केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 17:26 IST

भाजपप्रणीत केंद्र सरकार व भाजपच्या नेतृत्वात असलेल्या राज्य सरकारमार्फत कामगारांचे हक्क आणि अधिकारांवर हल्ला करीत आहे. उत्तर प्रदेश भाजपा सरकारने चार कायदे वगळता ३८ कामगार कायदे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकाळ्याफिती लावून कामकाज : कृती समितीचे निवेदनआठ राज्य सरकारांनी कामाचे तास १२ केले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने कामगार कायदे बदलण्याचा निर्णय घेतला असून, तो कामगारविरोधी असल्याने मागे घेण्यात यावा तसेच केंद्र सरकारच्या २० लाख कोटी रुपयांच्या फसव्या पॅकेजचा निषेधार्थ शुक्रवारी कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी निषेध दिन जिल्ह्यातही सर्वत्र पाळण्यात आला. कामगार, कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणीच काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदविला.

या संदर्भात कामगार, कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, भाजपप्रणीत केंद्र सरकार व भाजपच्या नेतृत्वात असलेल्या राज्य सरकारमार्फत कामगारांचे हक्क आणि अधिकारांवर हल्ला करीत आहे. उत्तर प्रदेश भाजपा सरकारने चार कायदे वगळता ३८ कामगार कायदे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन उद्योगासाठी जवळपास सर्व कायद्यातून त्यांना सूट दिली आहे. गुजरात आणि कर्नाटक सरकारनेही या पद्धतीचे निर्णय घेण्याचा घाट घातला आहे. आठ राज्य सरकारांनी कामाचे तास १२ केले आहेत. या सर्व निर्णयाचा परिणाम म्हणून कामगारांना गुलामगिरी पद्धतीमध्ये ढकलले जात आहेत. कामगारांचे वेतन, आरोग्य सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, मानवी प्रतिष्ठा या सर्वांवर हल्ला केला जात आहे. कोरोनो महामारीच्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन केंद्र व राज्य सरकारे कामगार व जनता विरोधी निर्णय घेत आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे. त्याचबरोबर कामगार कायदे बदलण्यास स्थगिती द्यावी, लॉकडाउनच्या काळात कामगार कपात न करता त्यांना पूर्ण वेतन द्यावे, लॉकडाउनमध्ये अडकलेल्या कामगारांना गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, खासगीकरण करू नये, कर्मचाºयांचे वेतन, भत्ते कपात करू नये, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, अशोक घुगे, सुनंदा जरांडे, दिलीप थेटे, श्यामसुंदर जोशी आदींच्या स्वाक्षºया आहेत.शुक्रवारी झालेल्या या आंदोलनात केंद्रीय कामगार संघटना सिटू, आयटक, इंटक, एचएमएस, भारतीय कामगार सेना, एनटीयूआय, टीयूसीआय, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, एआयसीसीटीयू, श्रमिक एकता महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या संघटनांनी आपापल्या कामाच्या ठिकाणीच काळ्याफिती लावून कामकाज केले व शासनाचा निषेध नोंदविला.(फोटो आहे.)

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक