शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांचे सात विविध अ‍ॅँगलमध्ये छायाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:44 IST

मतदानाच्या दिवशी मतपत्रिका पळविणे, मतदान प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करणे, हाणामारीच्या घटना घडणे आदी कारणांवरून निवडणूक आयोगाने देशपातळीवर अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. वर्षानुवर्षे अशा संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरीक्त पोलीस बंदोबस्तासह

ठळक मुद्देनिवडणूक तयारी : संवेदनशील केंद्रांचा आढावा येत्या पंधरा दिवसात सदरचे काम पुर्ण करण्यात येणार

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्रांना उपग्रहाशी जोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचे सात विविध अ‍ॅँगलमध्ये अक्षांश-रेखांशासह छायाचित्रे काढण्यात सुरूवात झाली आहे. येत्या पंधरा दिवसात सदरचे काम पुर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी खासगी छायाचित्रकारांना कंत्राट देण्यात आले आहे.मतदानाच्या दिवशी मतपत्रिका पळविणे, मतदान प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करणे, हाणामारीच्या घटना घडणे आदी कारणांवरून निवडणूक आयोगाने देशपातळीवर अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. वर्षानुवर्षे अशा संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरीक्त पोलीस बंदोबस्तासह निवडणूक अधिकारी, कर्मचा-यांनाही विशेष खबरदारी घ्यावी लागते. या संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीत बसून लक्ष ठेवू शकतील अशी योजना आयोगाच्या विचाराधिन असल्यामुळे सर्वच मतदान केंद्रांचे अक्षांश-रेखांश गोळा करण्याच्या सुचना सर्वच जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. जुलै ते आॅक्टोंबर या दरम्यान निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार पुर्नरिक्षण मोहिमे दरम्यानच मतदार यादीचे काम करणा-या बीएलओंना मतदारांच्या घरभेटी दरम्यानच मतदान केंद्रांची माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु त्यावेळी उडालेल्या गोंधळामुळे सदरचे काम मागे पडले. देशपातळीवर लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचे थाटत असल्यामुळे आता आयोगाने त्यादृष्टीने तयारीचा भाग म्हणून लवकरात लवकर सर्वच मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर जिल्हाधिका-यांनी त्या त्या विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकाºयांना मतदान केंद्राचे छायाचित्रे काढण्याच्या सुचना दिल्या आहेत.प्रत्येक मतदान केंद्र उपग्रहाच्या माध्यमातून जोडण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने मतदान केंद्रांचे सात विविध दिशेने छायाचित्रे काढण्यात येणार आहे. त्यात मतदान केंद्रांवर जाण्याचा मार्ग, दिशा, मतदान केंद्राला लागून असलेल्या वास्तु, वस्ती, रहिवास, मतदान केंद्रांच्या पाठीमागचा परिसर, मतदान केंद्रांला जोडणारे रस्ते आदी भागाचा त्यात समावेश आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून निवडणूक आयोग त्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच वर्षानुवर्षे संवेदनशील ठरणाºया मतदान केंद्रांचा आढावा घेण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ४४२८ मतदान केंद्रांवर खासगी छायाचित्रकारांच्या माध्यमातून छायाचित्र काढण्यास सुरूवात झाली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक