शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदाराच्या दादागिरीच्या निषेधार्थ नाशिक आदिवासी विकास भवनातील अधिकारी-कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:58 IST

चव्हाण यांनी कार्यालयात हुज्जत घालत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे

ठळक मुद्देमाजी आमदार संजय चव्हाण यांनी शासकिय कामात अडथळा आणून शिवीगाळसर्व कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून बुधवारी कार्यालयात हजेरी लावली.

नाशिक : आदिवासी विकास भवन येथील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयातील उपसंचालक जागृती कुमरे यांच्या माजी आमदार संजय चव्हाण यांनी शासकिय कामात अडथळा आणून शिवीगाळ केल्याप्रकरणी बुधवारी (दि.६) कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन निषेध नोंदविला.माहितीच्या अधिकारामध्ये मागविलेल्या माहितीची विचारणा करण्यासाठी आलेले बागलाण तालुक्यातील माजी आमदार तथा विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांनी कार्यालयात हुज्जत घालत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करत शासकीय कर्मचाºयांच्या सुरक्षेचा चव्हाट्यावर आलेल्या प्रश्नाविषयी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. आदिवासी विकास भवन कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा वाढवून बाहेरील कुठल्याही राजकिय व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप व अरेरावी थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन आदिवासी विकास आयुक्तांना सादर करण्यात आले. सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन ठिय्या दिला. यावेळी सर्व कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून बुधवारी कार्यालयात हजेरी लावली. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सकाळी साडेअकरा वाजेनंतर महिला-पुरूष अधिकारी-कर्मचा-यांनी ठिय्या देऊन चव्हाण यांच्या दादागिरीचा निषेध नोंदवून कठोर कारवाईची मागणी केली. दुपारी जेवणानंतर पुन्हा आंदोलन पुर्ववत करण्यात आले. एकूणच आदिवासी विकास भवनातील कामकाज या आंदोलनामुळे प्रभावीत होऊन पुर्णपणे ठप्प झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय