शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी विमानतळ रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:05 IST

जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी विमानतळ या सुमारे १६ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने या रस्त्याने पायी चालण्यासह व वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्याचे काम बंद असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘सबुरी’चे धोरण स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शैलेश कर्पे ।सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी विमानतळ या सुमारे १६ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने या रस्त्याने पायी चालण्यासह व वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्याचे काम बंद असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘सबुरी’चे धोरण स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ या सुमारे ७० किलोमीटर रस्त्याच्या कामास केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. पहिल्या टप्प्यात ओझर विमानतळ ते वावी या सुमारे ५० किलोमीटर रस्त्याचे तीन वर्षांपूर्वीच काम झाले. त्यानंतर उर्वरित वावी ते शिर्डी विमानतळ (वेस) या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते गेल्या वर्षभरापूर्वीच करण्यात आला.  वावी ते सायाळे या रस्त्याचे  काम अंदाजपत्रकानुसार होत  नसल्याने सायाळे येथील  सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली होती.कार्यारंभाची तारीख तीन महिन्यांपूर्वीचवावी ते शिर्डी विमानतळ या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार  हेमंत गोडसे यांच्या हस्ते सुमारे वर्षभरापूर्वी करण्यात आला होता.त्यानंतर दोन-तीन महिन्यात या रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात  आला होता. रस्त्याच्या कामाची माहिती देणारा फलक रस्त्याच्या कडेला लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी केल्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कडेला कामाचा फलक लावण्यात आला आहे; मात्र त्यावर कामाच्या कार्यारंभ आदेशाची तारीख १७ आॅक्टोबर २०१७ दाखविण्यात आली आहे. फलक लावण्यापूर्वी दुशिंगपूर ते मलढोण फाटा या सुमारे ४ किलोमीटर रस्त्याचे काम झाले असताना कार्यरंभाची तारीख तीन महिन्यांपूर्वीची दाखविण्यात आल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.शताब्दी समाधी महोत्सवामुळे पदयात्रेकरुंची संख्या वाढली शिर्डी येथील साईबाबांच्या शताब्दी समाधी महोत्सवाचे २०१८ हे वर्ष आहे. त्यामुळे गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे व उपनगरासह नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पायी दिंड्या शिर्डीला जात आहेत. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे आल्यानंतर दुशिंगपूर, सायाळे, जवळके, डोºहाळे मार्गे शिर्डीला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. याच मार्गाला पालखी रस्ता म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. जवळचा मार्ग असल्याने अनेक दिंड्या महामार्ग सोडून या रस्त्याने पायी शिर्डीला जात असतात. त्यामुळेच या रस्त्याला पालखी मार्ग असेही संबोधले जाऊ लागले आहे. या रस्त्यावर शिर्डी विमानतळ असल्याने या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. यावर्षी महिन्याभरात या रस्त्याने हजारो पदयात्रेकरू शिर्डीला गेले आहे; मात्र रस्त्याचे काम रखडलेले असल्याने साईभक्तांचा प्रवास खडतर झाला आहे.

टॅग्स :Airportविमानतळsaibabaसाईबाबा