शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा आरोग्य केंद्राचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:16 IST

पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले आहे.

पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले आहे.पाटोदा येथे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यासाठी तीन कोटी पाच लाख रु पये निधी मंजूर असलेला सुसज्ज असा दवाखान्याच्या इमारतीचे पायाभरणीचे काम सुरु आहे.परंतु प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यअध्यक्ष रामभाऊ नाईकवाडी यांनी इमारतीच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली. त्यात सिमेंट व वाळू वापरत नसल्याचे लक्षात आले व इमारतीचे सुरु असलेले निकृष्ठ दर्जाचे काम त्यावर आक्षेप ठेऊन प्रहार संघटनेने कामाच्या पायाभरणीवरच बोट ठेऊन काम बंद पाडले. येवला तालुक्यातील राजकीय तसेच आर्थिक दृष्ट्या महत्व असलेल्या पाटोदा येथील आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम शासकीय निधीतून सुरु आहे. पायाभरणीचे काम निकृष्ठ दर्जाचे बांधकाम मटेरीअल वापरत असल्याचे गावातील प्रहारचे जिल्हा कार्यअध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे व शाखा अध्यक्ष गोरख निर्मळ यांच्या लक्षात आले. त्यांनी इतर कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मदतीने बांधकाम स्थळी जात पाहणी करून सुपरवाईझर व ठेकेदार यांना सदर काम निकृष्ठ दर्जाचे होत असून कामाच्या प्लन इस्टीमेट बाबत विचारणा केली. वास्तविक शासन विकास कामांसाठी जनसामान्यांच्या करातून आलेली कोट्यवधी रु पयाची रक्कम खर्च करते पण संगनमताने सर्वस्थरीय चळवळीतून मोजकी रक्कम शेवटच्या घटका पर्यंत पोहचवत असताना असे गैरप्रकार प्रहार संघटना खपवून घेणार नाही, असे रामभाऊ नाईकवाडे, गोरख निर्मळ व त् हरिभाऊ महाजन यांनी सांगितले.यावेळी सुनील पाचपुते, सरपंच चंद्रकला नाईकवाडे, दिनेश जगताप, रतन बोरनारे, बाळासाहेब बोराडे, सोमनाथ भुसारे, किशोर भोसले, दत्तू बोरनारे व ग्रामस्थ उपस्थित होते.-------------सुपरवायझर निरूत्तर तर ठेकेदाराची सारवासारवसदर ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने रामभाऊ नाईकवाडे यांनी गटविकास अधिकारी व पंचायत समिती सभापती यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत निकृष्ठ कामाबाबत माहिती दिली. सदर ठेकेदार ठराविक मापदंडा नुसार काम करत नसून काम बंद करण्याच्या सूचना दिल्या व सदर अधिकाऱ्यांनी लवकरच पाहणी करत असल्याचे सागितले. याबाबत सुपरवायझर निरूत्तर झाला तर ठेकेदाराने सारवासारव केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक