शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ऊर्जा विकासाच्या कामांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:00 IST

महावितरणने नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ऊर्जा विकासाला चालना दिली असल्याने सुमारे ४६० कोटींची कामे करून वीज वितरणचे जाळे निर्माण केले आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आल्याचे होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.

नाशिक : महावितरणने नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ऊर्जा विकासाला चालना दिली असल्याने सुमारे ४६० कोटींची कामे करून वीज वितरणचे जाळे निर्माण केले आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आल्याचे होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.  महावितरण कंपनीच्या चार वर्षांच्या कामकाजाच्या आढावा पुस्तिकीचे प्रकाशन पाठक यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी कोकण प्रादेशिक विभागाचे संचालक श्रीकांत जलतारे, लघु व मध्य उद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, महापारेषणचे मुख्य अभियंता जयंत वीके, महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर आदी उपस्थित होते. यावेळी पाठक म्हणाले, सर्वोत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने महावितरणने गेल्या चार वर्षांत वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी मूलभूत सुविधा निर्मितीची भरीव कामे केली आहेत. त्यासाठी प्रामुख्याने पायाभूत विकास आराखडा टप्पा-२, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रम, जिल्हा नियोजन विकास समिती आदी योजनांच्या माध्यमातून नवीन उपकेंद्र उभारणी, अतिरिक्त उपकेंद्र रोहित्र, उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढ, नवीन वितरण रोहित्र, वितरण रोहित्रांच्या क्षमतेत वाढ आदी कामे पूर्ण झाली आहेत व काही कामे प्रगतिपथावर आहेत. गत चार वर्षांत जिल्ह्यात विविध योजनांतून ऊर्जा विकासाची ४६० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. तर ४९६ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे प्रगतिपथावर आहेत.सौभाग्य योजनेतून विद्युतीकरणापासून वंचित असलेल्या कुटुंबीयांच्या मोफत वीजजोडणी, दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी अटल सौर कृषिपंप योजना, शेतकºयांना दिवसा अखंडित वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना जोडणी देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या महत्त्वाकांक्षी योजनांची यशस्वी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज